लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर | पुढारी

लता मंगेशकर यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा व्हेंटिलेटरवर

पुढारी ऑनलाईन

सूरसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती खालावली आहे. यामुळे त्यांनी आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले असून पुन्हा त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

मागील २७ दिवसांपासून त्या मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांचे व्हेंटिलेटरवर हटवण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याची माहिती समजते. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांना आता आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांची देखरेख सुरू आहे.

 

Back to top button