Union Budget 2022 : ‘जीडीपी’ ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज : अर्थमंत्र्यांचा विश्वास | पुढारी

Union Budget 2022 : 'जीडीपी' ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज : अर्थमंत्र्यांचा विश्वास

पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ निर्मला सीतारमन यांनी संसदेत अर्थसंकल्‍प मांडण्‍यास सुरूवात केली आहे. अर्थमत्र्यांनी म्हटलं आहे की, “कोरोना जास्त प्रभाव आपल्या देशावर पडलेला आहे. त्यातून आपल्या देशाची अर्थव्यवस्था हळूहळू सावरत आहे. देशाचा सकल राष्‍ट्रीय उत्‍पन्‍न ( जीडीपी ) ९.२ टक्क्यांवर राहण्याचा अंदाज आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेतून पायाभूत सुविधेतून गुंतवणूक करणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत अर्थसंकल्पाचे वाचन करत आहेत. त्या संसदेत #Budget2022 सादर करत आहे. यंदाचा अर्थसंकल्प पेपरलेस असून त्या टॅबच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर करत आहेत. अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा मोठा परिणाम झाला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात २०४७ पर्यंतची रुपरेषा आखली गेलीय. पंतप्रधान गती शक्ती योजना ही पायाभूत सुविधांसाठी आहे, त्यात मोठी गुंतवणूक करणार देशात ६० लाख नव्या नोकऱ्या मिळणार आहेत. देशाचा जीडीपी ९.२ टक्के राहील, असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

.

Back to top button