5G नेटवर्क : एअरटेल-टाटा ग्रुप एकत्र!, देशी तंत्रज्ञानाचा वापर

5G नेटवर्कसाठी एअरटेल-टाटा ग्रुप एकत्र!, देशी तंत्रज्ञाचा वापर
5G नेटवर्कसाठी एअरटेल-टाटा ग्रुप एकत्र!, देशी तंत्रज्ञाचा वापर
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : टेलिकॉम कंपनी एअरटेल आणि टाटा ग्रुपने एक रणनीतिक भागीदारी (स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप) ची घोषणा केली आहे. ही भागीदारी भारतात 5G जी नेटवर्क सोल्यूशन्ससाठी झाली आहे.

भागीदारी अंतर्गत ओपन-आरएएन आधारित 5G रेडिओ आणि कोर सोल्यूशन्सचा वापर केला जाईल.

टाटा ग्रुपने हे सोल्यूशनचा मॉडेल स्थानिक पातळीवर विकसित केले आहे. भारतासाठीच्या 5G नेटवर्क सोल्यूशनची भारतातच निर्मिती करण्यात येईल, अशी भारती एअरटेल आणि टाटा ग्रुपने घोषणा केली आहे.

टाटा ग्रुपने ओ-आरएएन आधारित रेडियो आणि एनएसए/एसए कोर 'अत्याधुनिक' विकसित केले आहे.

हे तंत्रज्ञान जानेवारी २०२२ पासून व्यवसाईक वापरासाठी उपलब्ध केले जाणार आहे.

अधिक वाचा :

भारतात एअरटेलच्या 5G नेटवर्कची चाचणी जोरात सुरू आहे. नेटवर्कच्या क्षमता आणि कार्यक्षमतेची विस्तृत तपासणी टाटा ग्रुप करीत आहे.

एअरटेल नोकिया आणि एरिक्सनसारख्या जागतिक ब्रँड तसेच टाटा ग्रुप सारख्या देशांतर्गत कंपन्यांसह 5G जी नेटवर्कसाठी काम करत आहे.

दरम्यान, भारतात पूर्ण विकसित 5G सेवा सुरू करणारे पहिले नेटवर्क हे जिओचे असेल असा जिओने दावा केला आहे. अशातच एअरटेल कंपनीही आपल्या 5G च्या लाँचिंगमध्ये मागे राहणार नसल्याचे एकंदरीत चित्र आहे.

जानेवारी 2022 पासून एअरटेल टाटा ग्रुपचे हे तंत्रज्ञान वापरून आपल्या 5G च्या लॉन्चिंगचे नियोजन करेल.

सुरुवातीला हा पथदर्शी प्रकल्प म्हणून चालविला जाईल. याचबरोबर भारत सरकारने जारी केलेल्या सर्व मार्गदर्शक सूचनांचीही दखल घेतली जाईल.

अधिक वाचा :

ही 5G उत्पादने आणि सोल्यूशन्स जागतिक मानके लक्षात घेऊन तयार केली जात आहेत.

एअरटेलच्या पायलट प्रोजेक्टमध्ये 5G सोल्यूशन्स त्यांचे कौशल्य सिद्ध करू शकतील, तर ते निर्यात मार्गही उघडेल.

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस 5 जीपीपी आणि ओ-आरएएन या दोन्ही मानकांसाठी एंड-टू-एंड सोल्यूशन्समध्ये मदत करते.

एयरटेल ने बताया कि गुरुग्राम येथील सायबर हब परीसरात एअरटेल 5G ट्रायल नेटवर्क लाईव्ह झाले आहे. 91 मोबाईल्सच्या माध्यमातून हे नेटवर्क 3500 MHz बॅड वर ऑपरेट केले जात आहे.

विषेश बाब ही आहे की, या नेटवर्कच्या माध्यमातून खूपच शानदार डाऊनलोड स्पीड मिळत आहे. रिपोर्टनुसार एअरटेलचे 5G नेटवर्क 1Gbps हून अधिकचे डाऊनलोड स्पीड देत आहे.

'भारतातील 5G नेटवर्कसाठी टाटा ग्रुपसोबत करार केल्याचा आनंद आहे. जागतिक स्तरावरील तंत्रज्ञान परिसंस्था आणि टॅलेंट पूलसह, जगासाठी अत्याधुनिक उपाय आणि अनुप्रयोग तयार करण्यासाठी भारत चांगल्या स्थितीत आहे. हे भारताला नाविन्यपूर्ण आणि निर्मितीचे डेस्टिनेशन बनविण्यात मदत करण्यासाठी बरेच पुढे जाईल.
गोपाल विठ्ठल (भारत आणि दक्षिण आशियाचे भारती एयरटेलचे एमडी आणि सीईओ)

राजद खासदार मनोज झा यांचे राज्यसभेतील हृदयस्पर्शी भाषण एकदा पहाच

https://youtu.be/4uD7NXUeHQc

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news