मुंबई; पुढारी वृत्तसेवा: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह अन्य आरोपींविरोधात मुंबईतील मरीन ड्रॉईव्ह पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघाना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
अधिक वाचा
यातील तक्रारदार हे व्यावसायिक असून त्यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी मुख्य आरोपी व त्यांचे इतर सहकारी साथीदार, तसेच संबंधित पोलीस अधिकारी यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस ठाणे येथे भादंवि कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 (b), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111, 113 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अधिक वाचा
परमबीर यांच्या विरोधात करण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या तक्रारींवरुन त्यांची खुली चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) परवानगी दिली आहे.
तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल हे व्यावसायिक असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी परमबीर यांच्यासह पोलीस उपायुक्त अकबर पठाण, पोलीस अधिकारी श्रीकांत शिंदे, नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, आशा कोरके, खासगी व्यक्ती सुनील जैन आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील जैन आणि पुनमिया यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचलं का?