

खार्तूम : वृत्तसंस्था : सुदानमध्ये (Sudan War) लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान कर्नाटकातील 31 आदिवासी बांधव अडकले आहेत. हे सर्व लोक सध्या सुदानच्या अल-फशर शहरात असून, ते वनौषधी विकायला म्हणून सुदानला आले होते. 19 जण हुनसूर, 7 जण शिवमोग्गा आणि 5 जण चन्नागिरी येथील आहेत.
आमच्याकडे खायला-प्यायलाही काही नाही. बाहेर पडायचे तर स्फोट सुरू आहेत. कोणीही आम्हाला मदत करायला तयार नाही. सुदानमधील परिस्थितीवर आमचे लक्ष असून, भारतीयांच्या मदतीची व्यवस्था केली जाईल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
सुदान निमलष्करी दलाच्या सैनिकांनी अमेरिकन दूतावासाच्या ताफ्यावर आणि युरोपियन युनियनच्या (ईयू) राजदूतावर हल्ला केला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ताफ्यावर अमेरिकन ध्वज असतानाही हा प्रकार घडल्याने आम्ही त्याची गंभीर दखल घेतली आहे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :