

पुढारी ऑनलाइन डेस्क : Shahdol, MP : सिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी दोन मालगाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात घडला. गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांच्या इंजिनांना आग लागली. घटनेत एका लोको पायलटचा मृत्यू झाला आहे तर दोघे गंभीर जखमी आहे. बचावकार्य सुरू आहे. बिलासपूर-कटनी मार्गावरील सर्व गाड्या प्रभावित झाल्या आहेत.
मध्य प्रदेशातील सिंगपूर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सकाळी 6.30 च्या सुमारास दोन मालगाड्या बिलासपूर ते कटनी रेल्वे मार्गावर शहडोलच्या 10 किमी आधी मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. ही टक्कर इतकी भीषण होती की, गाड्यांचे इंजिन एकमेकांवर चढले. त्यामुळे गाड्यांच्या इंजिनांना आग लागली आणि डबे उलटले. घटनेत एका लोको चालकाचा मृत्यू झाला आणि त्याचे दोन सहकारी जखमी झाले. रेल्वेचे दोन कर्मचारी डब्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातानंतर बिलासपूर-कटनी मार्गावरील सर्व गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर-कटनी सेक्शनवरील सिंगपूर स्टेशनवर आज सकाळी कोळशाने भरलेल्या मालगाडीचा सिग्नल ओव्हरशूट झाल्यानंतर इंजिनसह 09 वॅगन्स रुळावरून घसरल्याबद्दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने बुलेटिन जारी केले, तिन्ही मार्गांवर रेल्वेचे कामकाज ठप्प झाले. या मार्गावरील डाऊन आणि मिडल थांबविण्यात आले. रेल्वे प्राधिकरणाने हेल्पलाइन क्रमांक- 1072 जारी केला.
हे ही वाचा :