कर्नाटक विधानसभा निवडणूक : भाजपची देवेंद्र फडणवीसांसह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर | पुढारी

कर्नाटक विधानसभा निवडणूक : भाजपची देवेंद्र फडणवीसांसह ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली असून या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्याबरोबरच ना. नीतीन गडकरी, स्मृती ईराणी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी खासदार प्रभाकर कोरे यांचा समावेश आहे.

कर्नाटक विधानसभेसाठी येत्या 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून आज (दि.१९) स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली. यादीत सामील असलेल्या अन्य नेत्यांमध्ये क्रमशः कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आसामचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, योगी आदित्यनाथ, शिवराजसिंग चौहान, हेमंत बिसवा सरमा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, सदानंद गौडा, कर्नाटक भाजपचे अध्यक्ष नलीन कटिल, केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी, के. एस. ईश्वरप्पा, एम. गोविंद काजरोळ, आर. अशोक, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, तामिळनाडू भाजपचे अध्यक्ष के. अण्णामलाई, अरुण सिंग, डी. के. अरुणा, सी. टी. रवी, शोभा करंदलजे, ए. नारायणस्वामी, भगवंत खुबा, अरविंद लिंबावली, बी. श्रीरामुलू, कोटा श्रीनिवास पुजारी, बसनगौडा पाटील यत्नाळ, उमेश जाधव, सी. नारायणस्वामी, एन. रवीकुमार, जी. व्ही. राजेश आदींचा समावेश आहे.

हेही वाचा : 

Back to top button