अनिल परब यांनी घेतली संजय राऊत यांची भेट

अनिल परब यांनी घाईघाईत संजय राऊत यांची घेतली भेट
अनिल परब यांनी घाईघाईत संजय राऊत यांची घेतली भेट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : परिवहन मंत्री अनिल परब यांना  १०० कोटींच्या वसुली प्रकरणी  'ईडी'ने नोटीस पाठवली आहे. मंत्री परब यांना मंगळवारी ३१ रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर अनिल परब यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. संजय राऊत यांच्या भेटीसाठी परब हे सामना कार्यालयात गेले हाेते.

मंत्री परब हे सामनाच्या कार्यालयात खासदार संजय राऊत यांना भेटण्यासाठी गेले होते.

फक्त दहा मिनिटांतच ते कार्यालयातून बाहेर आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत.

रत्नागिरीतील जन आशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वक्तव्यानंतर ही अटक करण्यात आली.

या अटकेसाठी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब रत्नागिरी पोलिसांना सूचना करत होते. ही संपूर्ण घटना वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली.

दरम्यान, अनिल परब यांना पाठवण्यात आलेली 'ईडी'ची नोटीस ही नारायण राणे यांच्या अटकेनंतर केंद्र सरकारने सूडबुद्धीने केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

ईडी पुराव्याशिवाय कारवाई करत नाही : पक्षनेते प्रवीण दरेकर

खासदार राऊत यांच्या आरोपांवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ईडी पुराव्याशिवाय कोणतीही कारवाई करत नाही. त्याच्याकडे परब यांच्या विरोधात निश्चितपणे काही पुरावे आहेत, त्यानंतरच नोटीस पाठवण्यात आली असणार, असे दरेकर म्हणाले.

हेही वाचलं का?

पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी काढलेल्या पदयात्रेबाबत राजू शेट्टी यांची पत्रकार परिषद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news