अखेर तालिबानचा म्‍होरक्‍या हैतबुल्‍लाह अखुंदजादा याचा ठावठिकाणा मिळाला | पुढारी

अखेर तालिबानचा म्‍होरक्‍या हैतबुल्‍लाह अखुंदजादा याचा ठावठिकाणा मिळाला

काबुल : पुढारी ऑनलाईन; तालिबान्‍यांनी अफगाणिस्‍तानवर कब्‍जा मिळविल्‍यानंतर देशात सर्वत्र अनागोंदी माजली आहे. तालिबान नेहमीच आपल्‍या प्रमुख पदावरील नेत्‍याला अज्ञातस्‍थळीच ठेवते. त्‍याचा ठावठिकाणी कोणालाही माहित नसतो;पण प्रथमच तालिबानने आपला म्‍होरक्‍या हैतबुल्‍लाह अखुंदजादा याच्‍या वास्‍तव्‍याची माहिती जाहीर केली आहे. हैतबुल्‍लाह अखुंदजादा याच्‍या वास्‍तव्‍याची माहिती घेण्‍याचा प्रयत्‍न अनेक देशातील गुप्‍तचर यंत्रणा करीत हाेत्‍या.

तालिबानच्‍या प्रवक्‍त्‍यानेच दिली माहिती

अनेक देशांमधील गुप्‍तचर संस्‍थांकडेही तालिबानच्‍या प्रमुखाची माहिती उपलब्‍ध असत नाही. मात्र बहुतांशवेळा त्‍याचे वास्‍तव्‍य कंदहार परिसरातच असते. तालिबान अफगाणिस्‍तानमध्‍ये दहशतवादाला खतपाणी घालणार नाही, असा करार अमेरिकेबरोबर तालिबान्‍यांनी केला आहे. मात्र तालिबानचा म्‍होरक्‍या अखुंदजादाचे वास्‍तव्‍य कंदहारमध्‍ये असल्‍याचे तालिबानचा प्रवक्‍ता जबीहुल्‍ला मुजाहिद याने म्‍हटले आहे. तसेच लवकरच तो सर्वांसमोर येईल, असा दावाही त्‍याने केला आहे.

विशेष म्‍हणजे, जबीहुल्‍ला मुजाहिद हा कधीच सार्वजनिकरित्‍या समोर आलेला नाही.

तसेच तालिबानमधील बडे नेतेही त्‍याला पाहू शकले नाहीत.

अखुंदजादा हा असा दहशतवादी आहे, ज्‍याला त्‍याचाच संघटनेतील कमी लोकांनी पाहिले आहे.

त्‍याचे नेमके वास्‍तव्‍य कोठे आहे, त्‍याचा दिनक्रम याबद्‍दलही खूप कमी जणांना माहिती असते. मात्र महत्त्‍वाचे सणांदिवशी तो सर्वांना मेसेज पाठवतो.

अखुंदजादा याने २०१६मध्‍ये तालिबानची सूत्रे स्‍वीकारली. यानंतर त्‍याचे वास्‍तव्‍य अफगाणिस्‍तानमध्‍येच असल्‍याचे मानले जाते. मात्र त्‍याचा नेमका ठावठिकाणा कोणत्‍याही देशातील गुप्‍तचर विभागाला मिळाला नव्‍हता.

कंदहार हा तालिबानचे मुख्‍य केंद्र मानले जाते. अखुंदजादा याच्‍यापूर्वी तालिबानची सूत्रे ही मुल्‍ला उमर याच्‍याकडे होती. उमर याचेही वास्‍तव्‍य कंदहारमध्‍येच होते.

अजूनही पडद्‍याआडच

तालिबान्‍यांनी अफगाणिस्‍तानवर कब्‍जा करुन १५ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले आहेत.

यानंतरही अखुंदजादा माध्‍यमांसमोर आलेला नाही. मात्र आजही त्‍याचे सर्व तालिबानवर त्‍याचे वर्चस्‍व आहे.

स्‍वत: तालिबानच्‍या प्रवक्‍त्‍यानेच त्‍याच्‍याबद्‍दल माहिती दिल्‍याने अखुंदजादा याचा ठावठिकाणाी आणि वास्‍तव्‍य दोन्‍ही स्‍पष्‍ट झाले आहे.

आता अमेरिका कोणती कारवाई करणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडिओ : काबूल ग्राऊंड रिपोर्ट : तालिबान दहशत अनुभवलेला काबूलचा वालीजान

 

 

Back to top button