कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत आ. नितेश राणेंनी वेधले एमडींचे लक्ष | पुढारी

कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत आ. नितेश राणेंनी वेधले एमडींचे लक्ष

कणकवली ः पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वेच्या समस्यांबाबत आ. नितेश राणे यांनी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांची भेट घेत त्यांचे लक्ष वेधले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मुंबईतील निवासस्थानी कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक व अन्य अधिकारी भेट घेण्यासाठी आले असता त्यांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले.या निवेदनात आ. राणे यांनी म्हटले आहे, कोकण रेल्वेमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या त्या भूमिपूत्रांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये नोकर्‍या मिळालेल्या नाहीत. याबाबत कार्यवाही व्हावी, मुंबई दादर स्टेशन वरून रात्री 12.05 वा. सुटणारी गाडी क्रमांक 11003 तुतारी एक्सप्रेस गाडीच्या वेळेत बदल करण्यात यावा, सदर गाडी क्रमांक 11003 तुतारी एक्सप्रेस 12.05 वा. ऐवजी 23.50 वा. असा बदल करण्यात यावा.

जेणेकरून प्रवाशांमध्ये होणारा गैरसमज दूर होईल, तिवरे ता. कणकवली येथे कोकण रेल्वेमुळे वाहतूकीसाठी होणारा अडथळा दूर करून सदरहू ठिकाणी रस्ता तयार करणे व साकव बांधणे, गाडी क्रमांक 11003/11004 तुतारी एक्सप्रेस गाडीला नांदगाव येथे थांबा द्यावा. जेणेकरून नांदगाव व देवगड तालुका परिसरातील प्रवाशांना होणारा प्रवास करणे सोयीचे होईल, मुंबईमध्ये पश्चिम उपनगरात राहणार्‍या लोकांसाठी दादर-वसई मार्गे सावंतवाडी अशी पैसेंजर गाडी सायंकाळी सोडण्यात यावी, नेत्रावती एक्सप्रेस (गाडी क्रमांक 16345/16346) गाडीला कणकवली येथे थांबा द्यावा, तुतारी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11003/11004) गाडीचा कोटा वाढवावा. तसेच गाडीच्या डब्यांची संख्या वाढवावी. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

Back to top button