

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : यापुढे व्हॉटस ॲपच्या माध्यमातून फालतू चर्चा करणारे व आपेक्षार्ह मेसेज पाठविणार्यांना दणका बसणार आहे. देशात मागील एका महिन्यात हॉटस ॲपच्या २० लाख अकाउंटवर कारवाई करत ते बॅन करण्यात आले आहे.
अधिक वाचा
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी माहिती तंत्रज्ञान नियमांची (मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) अंमलबजावणी करण्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.
केंद्र सरकराच्या या नव्या नियमावलीस सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म देणार्या कंपन्यांनी विरोध केला होता. मात्र याच कायदामुळे आता भारतात एका महिन्यात व्हॉटस् ॲपचे २० लाखा अंकाउंट बॅन केले गेले आहेत. १५ मे ते १५ जून या एक महिन्यांच्या काळात आक्षेपार्ह मजकूर असणारे हे अंकाउंट आहेत.
व्हॉटस ॲपने देशात अशा प्रकारे प्रथमच कारवाई केली आहे.यासंदर्भात व्हॉटस ॲपने म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय पातळीवर एका महिन्यात आक्षेपार्ह मेसेज करणारे ८० लाख अकाउंट बॅन केले आहेत. यातील २० लाख अंकाउंट हे भारतातील आहेत. भारतमधील अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे.
ज्या अकाउंटवरुन आक्षेपार्ह मजूकर देण्यात आला.तसेच सामाजिक सलोखा व शांतता बिघडविणार्या मजकूर व्हायरल करणार्या अकाउंटवरच ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनावश्यक मेसज येणार्या लोकांनी संबंधित अकाउंटसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. अशा व्हॉटस ॲप अकाउंटवरही बॅन आणण्यात आला आहे. व्यक्तिगत बदनामी करणारे आणि आक्षेपार्ह मेसेज पाठविणार्यांवरही बॅन आणण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा
व्हॉटरस ॲपची सुरुवातपासून स्वत:चे गोपनीयता धोरण आहे. आता नवीन 'आयटी' कायद्यामुळे हे धोरण अधिक कडक
करण्यात आले आहे.
तुम्ही आक्षेपार्ह, स्पॅम आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देणारे मेसेज तसेच व्हॉटस ॲपच्या माध्यामातून एखाद्याला धमकी देण्याचा प्रकार केल्यास संबंधित अकाउंटवर बॅन येऊ शकतो.
तुम्हाला तुमचे व्हॉटस ॲप अकाउंट सुरक्षित ठेवायचे असेल तर कोणालाही आक्षेपार्ह व चुकीचा संदेश पसरविणारे मेसेज पाठवू नका.
तसेच हिंसाचाराला खतपाणी घालणार्या मेसेज पासून दोन हात लांबच रहा, असेच या कारवाईने कंपनीने स्पष्ट केले आहे.
हेही वाचलं का?