

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा : दक्षिण भारतात दर्शनासाठी निघालेल्या शहरातील तरुणांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला बीड- उस्मानाबाद रस्त्यावर आज पहाटेच्या सुमारास अपघात झाला. बीड- उस्मानाबादरस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या चौघांचा अपघाती मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
तिरुपती बालाजीसह तिर्थस्थळ दर्शनासाठी तालुक्यातील तरुण गुरुवारी (दि.२२) निघाले होते.
बीड – उस्मानाबाद रस्त्यावर टेम्पो ट्रॅव्हलरचे चाक पंक्चर झाले.
ते बदली करण्यासाठी वाहन रस्त्याच्या कडेला उभे केले असतानाच
टेम्पोला एका आयशर ट्रकने जबर ठोस दिली.
धडक इतकी जोरात होती की आयशर उलटला आणि टेम्पो सात ते आठ फुट खोल फेकला गेला.
टेम्पोसमोर बसलेले शरद देवरे (वडगाव), जगदीश दरेकर, सतीष सुर्यवंशी (दोघे रा. दरेगाव) व विलास बच्छाव (सायने) हे चौघे जागीच ठार झाले. एकाची स्थिती गंभीर आहे.
ते सर्व खडीक्रशर व्यावसायिक होते. त्यांच्या निधनामुळे शहर व परिसरावर शोककळा पसरली आहे.