नाशिक : गोदावरी नदी पात्राबाहेर गटारीच्या काळपट पाण्याचा पूर! | पुढारी

नाशिक : गोदावरी नदी पात्राबाहेर गटारीच्या काळपट पाण्याचा पूर!

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे गुरुवार(दि.२२)पासून नाशिक शहरात पाणी कपात होणार आहे. तर दुसरीकडे दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदी ला गटारीच्या पाण्याचा पूर आला आहे. बुधवारी रात्री गोदावरी नदी दुथडी भरून वाहत होती, मात्र पाण्याचा रंग काळपट होता. शहरातील गटारांचे पाणी नदीत मिसळल्यामुळे हा पूर आल्याचे दिसून येत आहे.

सध्या गंगापूर धरणात पाणीसाठा कमी असल्यामुळे नाशिकमध्ये महापालिकेने आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.

अधिक वाचा : 

अशा परिस्थितीत धरणातून गोदावरीला पाणी सोडण्याचा प्रश्नच नाही.

दुसरीकडे मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस नाशिक शहरात पाऊस सुरू आहे.

शहरातील पावसाळी गटारी, नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत असून, हे सर्व पाणी गोदावरी नदीला मिळत आहे.

बुधवारी (दि.२१) रात्री गोदावरीला गटारीच्या पाण्याचा पूर आल्याचे पाहायला मिळाले.

अधिक वाचा : 

पाण्याचा उग्र वास नागरीकांचा संताप

विशेष म्हणजे या पुराच्या पाण्याचा उग्र वास येत असल्याच्या प्रतिक्रिया नदीलगत राहणाऱ्या नागरिकांनी दै. ‘पुढारी’कडे व्यक्त केल्या.
स्मार्ट सिटीचा दावा फोल

गोदापात्रातून गाळ काढल्यामुळे पुराचा धोका टळणार असल्याचा दावा स्मार्ट सिटी कंपनीने केला होता.

मात्र केवळ पावसाळी गटारी आणि नाल्यांमधून आलेल्या पाण्यामुळे गोदावरीला पूर आल्याने स्मार्ट सिटी कंपनीचा दावा फोल ठरल्याचा आरोप गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केला आहे.

अधिक वाचा : 

ठेकेदारांचे खिसे भरण्याचे काम

कंपनीने गाळा ऐवजी केवळ वाळू काढून ठेकेदाराचे खिसे भरण्यास मदत केल्याचेही जानी यांनी म्हटले आहे.

धरणातून पाणी न सोडता अशी अवस्था होत असेल तर भविष्यात पाऊस जास्त झाला आणि पाणी सोडल्यावर धोकादायक परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा : 

रमेश पोवार प्रशिक्षकपदी निवड
गोल्ड हॉलमार्किंग : उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य
गोल्ड हॉलमार्किंग : उद्यापासून देशात गोल्ड हॉलमार्किंग अनिवार्य
अदानी ग्रुप स्कुटरपासून रोल्स रॉयस्पर्यंतचा प्रवास कसा झाला?
अदानी ग्रुप स्कुटरपासून रोल्स रॉयस्पर्यंतचा प्रवास कसा झाला?
monsoon अवघ्या दोन दिवसांत केरळात दाखल होणार
monsoon अवघ्या दोन दिवसांत केरळात दाखल होणार
आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यातील वाद सुरूच
आयएमए आणि बाबा रामदेव यांच्यातील वाद सुरूच
संभाजीराजे यांनी फुंकले रणशिंग; मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार
संभाजीराजे यांनी फुंकले रणशिंग; मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा करणार
1
TestTestTest
Tejaswini Pandit samantar 2
Sai-5
previous arrow
next arrow

Back to top button