कोल्हापूर : महापुराचा विळखा सैलावतोय; पावसाची उसंत

कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा पडला असून पाणी दसरा चौकातील टायटन शोरूमपर्यंत आले आहे.
कोल्हापूर शहराला महापुराचा विळखा पडला असून पाणी दसरा चौकातील टायटन शोरूमपर्यंत आले आहे.
Published on
Updated on

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरला महापुराचा विळखा पडला आहे. मात्र, शुक्रवारी रात्रीपासून पावसाने उसंत घेतल्याने महापुराचा विळखा सैल होत असून पाणीपातळी एक फुटाने उतरली आहे.

अधिक वाचा:

गेल्‍या दोन दिवसांपासून कोल्‍हापूर शहर व जिल्‍ह्‍यात पावसाने हाहाकार माजवला होता. शहराला बेटाचे स्‍वरूप प्राप्‍त झाले होते. पण शनिवार पहाटे पासून पावसाने उघडीप दिली.

सकाळी सूर्याचे दर्शन झाल्‍याने कोल्‍हापूरकरांना तात्‍पुरता दिलासा मिळाला आहे.

राजाराम बंधार्‍यांची पाणी पातळी सकाळी ९ वाजता ५५. ७ वर आली होती. शुक्रवारी रात्री ती ५६ फुटावर होती.

चिखली गावाला पुराचा वेढा बसला असून एनडीआरफएफचे पथक नागरिकांना स्‍थलांतरित करत आहे.

अवघ्‍या दहा तासात पंचगंगा पाणी पातळी १४ फुटांनी वाढल्‍याने पंचगंगा नदीने धोका पातळीही ओलांडली. शहरात अनेक नागरिक भागात पाणी घुसले. हजारो नागरिकांचे स्‍थानिक तालीम मंडळे व संस्‍थांच्‍या मदतीने स्‍थलांतरण करण्‍यात आले.

बर्‍याच दिवसांनी सूर्याचे झाल्‍याने कोल्‍हापूरांना काहीसा दिलासा मिळाला. किमान पावसाने उसंत दिल्‍याने स्‍थलांतरीत कुटुंबे आता पुन्‍हा कधी घरी जायला मिळणार याची प्रतिक्षा करत आहेत. पावसाचा जोर ओसरला असला तरी पाण्‍याची पातळी स्‍थीर आहे. पुणे बेंगलोर राष्‍ट्रीय महामार्गावर चार फूट पाणी आहे अजूनही या मार्गावरील वाहतूक बंद आहे.

महामार्गावर वाहनांच्‍या रांगा

महामार्गावर मोठ्‍या प्रमाणात वाहनांच्‍या रांगा लागल्‍या आहेत. वाहनातील नागरिकांना अन्‍न व पाणी पुरवण्‍याचे काम स्‍थानिक नागरिक करत आहेत. शहरातील राजारामपूरी, परीख पूलातील पाणी कमी झाले आहे. यामार्गावरून वाहतूक सुरु आहे.

अनेक ठिकाणे पाण्यात

शाहुपूरी, व्हिनस कॉर्नर, फोर्ड कॉर्नर, कुंभार गल्‍ली, कदमवाडी , बापट कँम्‍प, फुलेवाडी, सुतारमळा परिसरातील पाणी पातळी स्थिर आहे.

परिस्‍थीतीचा आढावा घेवून पालकमंत्री सतेज पाटील यांनी एनडीआरएफच्‍या आणखी चार तुकड्‍यांना पाचारण केले आहे. या तुकड्‍या हवाई मार्गाने कोल्‍हापूरात दाखल हेाणार असून दुपार पर्यंत कोल्‍हापूरात पोहचण्‍याची शक्‍यता आहे.

कुरुंदवाड, शिरोळ भागात अजूनही स्‍थीती गंभीर आहे. राधानगरी धरणात ९३ टक्‍के पाणी साठा आहे. अजून एकही धरणाचा दरवाजा उघडलेला नाही.

अधिक वाचा

राधानगरी धरण ९3 टक्के भरले

पाणी ओसरण्याचा वेग जास्त असल्याने महापुराचे पाणी कमी होऊ शकते. राधानगरी धरणाचे दरवाजे अद्याप उघडले नसले तरी ते केव्हाही उघडू शकतात. त्यामुळे पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

सध्या शहरात टायटन शोरूम ते कोंडाओळ रस्ता, शहर वाहतूक कार्यालय, शहाजी कॉलेज, करवीर पंचायत समिती,

शिवाजी पेठेतील साकोली कॉर्नर, व्हिनस कॉर्नर, कुंभारवाडा, गवत मंडई, जाधववाडी, कदमवाडी,

जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, महावीर कॉलेज परिसर,रमणमळा, न्यू पॅलेस परिसर पूर्णपणे पाण्याखाली आहे.

अधिक वाचा

वातावरण असेच राहिल्यास एक दिवसात पाणी बऱ्याच अंशी उतरू शकते. महापुराचा विळखा असल्याने महामार्ग बंद आहे. परिणामी पुणे, मुंबईकडे जाणारे सर्व नागरिक कोल्हापुरात अडकले आहेत.

शुक्रवारी पन्हाळ्यावरील रस्ता खचला होता. शनिवारी रात्री सादळे मादळे येथील रस्ता खचला असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे.

राधानगरी धरणात ९६ टक्के पाणीसाठी असून स्वयंचलित दरवाजे केव्हाही उघण्यासारखी परिस्थिती आहे.

हेही वाचलेत का: 

पहा व्हिडिओ: महापुराचा विळखा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news