

सांगली पूर परिस्थिती अतिवृष्टीमुळे बिकट होत चालली आहे. त्यामुळे पुरपट्यातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत ७ हजार ६७१ कुटुंबातील ३६ हजार ९८७ व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आले आहे. याचबरोबर लहान व मोठी अशा एकूण १४ हजार ८०० जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे.
सांगली पूर स्थिती :
जिल्ह्यात पूरस्थितीमुळे ६ गावे पूर्णत: बाधित आहेत. तर ८० गावे अंशत: बाधित आहेत.
यामध्ये मिरज तालुक्यात महानगरपालिका क्षेत्रातील 1 गाव अंशतः बाधित आहे. तर मिरज ग्रामीण मध्ये २ गावे पूर्णत: तर २ गावे अंशत: अशी ४ गावे बाधित आहेत. अप्पर सांगली (ग्रामीण) मध्ये १५ गावे अंशत: बाधित आहेत.
वाळवा तालुक्यात वाळवा येथील २ गावे पूर्णत: तर २७ गावे अंशत: अशी एकूण २९ गावे बाधित आहेत. अपर आष्टा क्षेत्रातील १ गाव पूर्णत: तर ३ गावे अंशत: अशी एकूण ४ गावे बाधित आहेत. शिराळा तालुक्यातील अंशत: १३ गावे बाधित आहेत. तर पलूस तालुक्यातील १ गाव पूर्णत: तर १९ गावे अंशत: अशी एकूण २० गावे बाधित आहेत.
सांगली पूर : विविध क्षेत्रातील स्थलांतरीत
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : कोल्हापूरला महापुराचा विळखा