कोल्हापूर : पुरग्रस्त भागाच्या स्वच्छतेसाठी इथे मिळणार मोफत खराटा, ब्लिचिंग पावडर

कोल्हापूर
कोल्हापूर
Published on
Updated on

कोल्हापूर पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर शहराला महापुराने यावर्षीही वेढा घातला आहे. अनेक घर पाण्याखाली गेली आहेत. तर अनेकांच्या घरांची पडझड झाली आहे. आता पाणी ओसरत आहे. पुरग्रस्त भागांची सद्या स्वच्छता सुरु आहे. यासाठी ब्लिचिंग पावडर, फिनेल व खराटा यांची गरज असते. हीच गरज ओळखून कोल्हापूर च्या उद्योगपतींनी मदतीचा हात पुढ केला आहे.

उद्योगपती सचिन झंवर यांनी ब्लिचिंग पावडर उपलब्ध केली आहे. तर उद्योगपती योगेश शहा यांनी फिनेल व खराटा दिले आहे. गरजुंनी मुस्लीम बोर्डिंग कोल्हापूर येथे येऊन घेऊन जाण्याचे आवाहण गणी आजरेकर यांनी केले आहे.

जाहीर आवाहन

कोल्हापूर शहर व जिल्हयाला अतिवृष्टीमुळे महापुराचा फटका बसला आहे. पुरप्रवण क्षेत्रातील रहिवाशी घरांमध्ये पाणी घुसले होते. ईश्वराची कृपा होऊन पाऊस थांबल्याने पुराचे पाणी उतरले आहे. पुरग्रस्त आपआपल्या घरात परत जात आहेत. परंतु घरात जाण्यापूर्वी घराची स्वच्छता करणे आवश्यक आहे.

त्या करीता उद्योगपती सचिन झंवर यांनी ब्लिचिंग पावडर उपलब्ध केली आहे. योगेश शहा यांनी फिनेल व खराटा दिले आहे मुस्लीम बोर्डिंग येथे उपलब्ध आहे. गरजूंनी घेवून जावे असे आव्हान गणी आजरेकर चेअरमन मुस्लीम बोर्डिंग, कोल्हापूर यांनी केले.

शिवाजी पुलाला जोडून संलग्न नवीन ब्रिज बांधा : उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी (दि.२७) शिवाजी पूल येथे भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली.  पश्चिम महाराष्ट्र पूरग्रस्तांचे पुनर्वसन करायला शासन तयार आहे.  सध्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई संदर्भात राज्य मंत्रिमंडळात दोन दिवसात निर्णय घेतला जाईल. शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याचा प्रयत्न शासनाचा असेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरोळ येथे महापूर पाहणीच्या दौऱ्यावर असताना दिले.

हे ही वाचलत का :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news