कृणाल पांड्या कोरोनाग्रस्त; संपूर्ण संघ क्वारंटाईन | पुढारी

कृणाल पांड्या कोरोनाग्रस्त; संपूर्ण संघ क्वारंटाईन

कोलंबो; पुढारी ऑनलाईन डेस्क :

कृणाल पांड्या कोरोनाग्रस्त झाल्याने भारताचा संपूर्ण संघ क्वारंटाईन करण्यात आला असून श्रीलंकेविरुद्धचा आज होणारा दुसरा टी२० सामनाही स्थगित करावा लागला आहे.

बीसीसीआयने ट्विटवर दिलेल्या माहितीनुसार कृणाल पांड्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे श्रीलंकेविरुद्धचा दुसरा टी२० सामना स्थगित करण्यात आला असून तो उद्या होण्याची शक्यता आहे.

बीसीसीआयने कृणाल पांड्या पॉझिटिव्ह आल्यानंतर संपूर्ण संघाची आरटी – पीसीआर चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. तिसरा टी२० सामना २९ जुलैला होणार आहे. दरम्यान, वैद्यकीय पथकाने तातडीने कृणाल पांड्याच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचे विलगीकरण केले.

बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘आजच्या सामन्यापूर्वी रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता त्यात कृणाल पांड्या पॉझिटिव्ह आला. त्यानंतर वैद्यकीय पथकाने त्याच्या संपर्कात आलेल्या आठ सदस्यांचे विलगीकरण करण्यात आले आहे.

बीसीसीआय पुढे म्हणाली की, ‘आज संपूर्ण संघाची आणि सपोर्ट स्टाफची आरटी – पीसीआर चाचणी करण्यात आली आहे. जेणेकरुन अजून कोरोनाचा संसर्ग अजून कोणाला झाला आहे का हे तपासता येईल.’

भारताचा युवा संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी गेला आहे. भारताने एकदिवसीय मालिका २ – १ अशी जिंकली आहे.

तर टी२० मालिकेतील पहिला टी२० सामना जिंकून मालिकेत १ – ० अशी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकेतील सर्व सामने हे कोलंबो येथील प्रेमदासा स्टेडियमवर बायो बबलमध्ये खेळवण्यात येत आहेत.

पाहा व्हिडिओ : बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु

Back to top button