चॉकलेटची किंमत दिवसेंदिवस का वाढतेय? जाणून घ्या कारण
पुढारी ऑनलाईन डेस्क : चॉकलेट म्हटलं की लहान मुलं आलीच. इतकं या दोघांमधील समीकरण घट्ट होतं आणि आजही आहे. चिमुकल्यांचा हट्ट पुरवणे असाे की, स्मरणीय दिवसांचे सेलिब्रेशन अलिकडे आपल्याकडेही चाॅकलेटचा मनुराद वापर हाेताे. मागील काही वर्षांमध्ये चॉकलेटमध्ये आलेल्या विविधेतेमुळे सर्वच वयोगट चॉकलेट चवीने खाताना दिसताे. मात्र मागील काही दिवसांमध्ये याच्या किंमतीमध्ये वाढ होताना दिसत आहे. (Chocolate price) जाणून घेवूया या मागील नेमकं कारण काय आहे याविषयी…
गेल्या वर्षभरात चॉकलेटच्या किंमतीत १४ टक्क्यांनी वाढ
याबाबत 'सीएनबीसी'ने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की, वाढलेल्या कोकोच्या किमतीमुळे चाॅकलेट आणखी महाग हाेण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे. NielsenIQ च्या डेटाने दर्शविले आहे की, चॉकलेटच्या किमती गेल्या वर्षी १४ टक्के वाढल्या आहेत. कोकोचा अपुरा पुरवठा हे मागील मुख्य कारण आहे. या हंगामात काेकाे उत्पादनात सलग दुसरी तूट आहे. कोको पुरवठा कमी पातळीवर जाण्याची शक्यताही व्यक्त हाेत आहे. कोकोच्या किंमती शुक्रवारी $3,160 प्रति मेट्रिक टन वर वाढला. आठ वर्षातील हा दराचा उच्चांक ठरला आहे.
Chocolate price : 'एल निनो'चा कोकाे उत्पादनावर परिणाम
जगात पश्चिम आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर कोकोचे उत्पादन होते. जगाच्या कोको उत्पादनापैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक आयव्होरी आणि घानाचा वाटा आहे. 'एल निनो'मुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस आणि वेगाने वाहणारे वार्याचा कोको उत्पादनावर परिणाम झाला आहे. जगातील ४० टक्के कोको पुरवणारा आयव्हरी कोस्ट पूर आणि ओले हवामान परिस्थितीशी झगडत आहे. दरम्यान, 2023 च्या सुरुवातीपासून कच्च्या साखरेच्या किंमती 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. तज्ञांच्या मते, कोकोच्या किमती आणखी वाढणार आहेत त्यामुळे ग्राहकांना चॉकलेटसाठी आणखी पैसे मोजावे लागरणा आहेत.
कोकोच्या बाजारपेठेत आणखी तूट येण्याची शक्यता
एल निनो ही एक हवामान घटना आहे जी सामान्यत: मध्य आणि पूर्वेकडील उष्णकटिबंधीय पॅसिफिक महासागरात नेहमीपेक्षा जास्त उष्ण आणि कोरडी असते. या हवामान परिस्थितीमुळे यंदा कोकोचा उत्पादनाला फटका बसणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर ते सप्टेंबर या कालावधीत कोकोच्या बाजारपेठेत आणखी एक तूट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळेच कोकोच्या किंमती जवळपास चार दशकांतील सर्वोच्च पातळीवर आहेत. एल निनो अधिक तीव्र झाला आणि कोकोचे उत्पादन आणि गुणवत्ता कमी झाली तर ग्राहकांना चॉकलेटसाठी आणखी पैसे मोजावे लागणार हे स्पष्ट आहे.
हेही घटक ठरले चॉकेलट महाग होण्यास कारणीभूत
फूड कमोडिटी प्राइस डेटाबेस Mintec नुसार. चॉकलेट बार बनवण्यामध्ये मोठा भाग कोकोआ बटरचा आहे, ज्याच्या किमतीत मागील काही वर्षांमध्ये २०.५ टक्के वाढ झाली आहे. काही कोको मद्य गडद किंवा दुधात समाविष्ट केले जाते. कोकोचा वापर युरोपमधील विक्रमी उच्चांकाच्या जवळ आहे.
साखरच्या किंमतीत झालेली वाढही एक महत्त्वपूर्ण कारण ठरत आहे. फिच सोल्युशन्सच्या संशोधन युनिट, BMI ने 18 मे रोजी दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, भारत, थायलंड, मेनलँड चीन आणि युरोपियन युनियनमध्ये सुरू असलेल्या साखर पुरवठाही अपुरा आहे. कारण साखर उत्पादन पट्ट्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांना फटका बसला आहे. त्यामुळे चॉकलेटच्या किमती लवकरच कमी होतील, अशी ग्राहकांनी अपेक्षा करणे चुकीचे ठरणार आहे.
डार्क चॉकलेट होणार महाग
चॉकलेटच्या विविध प्रकारांपैकी, डार्क चाॅकलेट अधिक महाग हाेण्याची शक्यता आहे. डार्क चॉकलेटमध्ये त्याच्या पांढऱ्या आणि दुधाच्या चॉकलेट समकक्षांच्या तुलनेत अधिक कोको सॉलिड्स असता. तसेच ज्यामध्ये सुमारे ५० ते ९० टक्के कोको सॉलिड्स, कोकोआ बटर आणि साखर असते.
हेही वाचा :
- चाॅकलेटचा रंजक इतिहास माहिती आहे का?
- Dark Chocolate : रक्तदाब नियंत्रणासाठीही डार्क चॉकलेट गुणकारी
- World Chocolate Day Special: चॉकलेट लव्हर असाल तर या ५ ठिकाणांना नक्की भेट द्या
- Chocolate cake recipe | घरच्या घरी बनवा चॉकलेट केक
- White chocolate : व्हाईट चॉकलेट म्हणजे नेमकं काय असतं?
- expensive chocolate : जगातील सर्वात महागडे चॉकलेट

