Dark Chocolate : रक्तदाब नियंत्रणासाठीही डार्क चॉकलेट गुणकारी | पुढारी

Dark Chocolate : रक्तदाब नियंत्रणासाठीही डार्क चॉकलेट गुणकारी

लिंडन : चॉकलेट बार खाणे आवडत नाही असे म्हणणारा माणूस विरळच. केवळ लहान मुलांनाच नव्हे तर प्रौढांनाही चॉकलेट खाणे आवडते. ते खाण्यासाठी आता एक चांगले कारणही मिळाले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की डार्क चॉकलेटचे सेवन हे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठीही मदत करू शकते.

एका नवीन संशोधनात स्पष्ट झाले आ हे की ‘डार्क चॉकलेट’ खाल्ल्याने डोकं शांत राहून उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंटस् जास्त प्रमाणात असते, जे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

स्वीडनच्या संशोधकाच्या एका दलाने हे सांगितले की ‘डार्क चॉकलेट’ शरीरात त्याचप्रमाणे परिणाम करते जसे रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी घेणारी एखादी गोळी! डार्क चॉकलेटमध्ये बर्‍याच मात्रेत ‘कोकोवा’ असतो, ज्यात केटेचिन्स आणि प्रोसाइनीडाईन्स जास्त प्रमाणात असतात, जे रक्तदाबाला प्रभावित करतात. संतुलित आहार आणि धूम—पानापासून दूर राहून डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने हृदयरोग नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. तसेच डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने ताण तणाव कमी होण्यास मदत मिळते. त्याचे सेवन हृदयाबरोबरच मेंदूच्या आरोग्यासाठीही लाभदायक ठरते.

Back to top button