लंडन : चॉकलेट बार खाणे हे केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही लाभदायक असते. विशेषतः हृदयाच्या आरोग्यासाठी चॉकलेट लाभदायक ठरू शकते. चॉकलेटमध्येही दोन प्रकार आहेत. एक आहे डार्क चॉकलेट व दुसरे व्हाईट चॉकलेट. (White chocolate) डार्क चॉकलेट हे गडद तपकिरी रंगाचे असते तर व्हाईट चॉकलेट सफेद. अर्थातच यामध्ये इतकाच फरक नाही. त्यामधील घटकांमध्येही फरक असतो. खरे तर व्हाईट चॉकलेट हे खर्या अर्थाने 'चॉकलेट' नसतेच!
चॉकलेट विकले जात असताना ते किती 'डार्क' आहे हे सांगतच विकले जात असते. त्यावरील पॅकेजिंगवर 35, 55, 78 टक्के किंवा अन्य टक्केवारी नोंदवलेली असते. ही टक्केवारी चॉकलेटमध्ये (White chocolate) किती प्रमाणात कोकोआ पावडर आणि कोकोआ बटर वापरले आहे ते सूचित करते. ही टक्केवारी जितकी कमी तितके ते चॉकलेट व्हाईट चॉकलेटच्या जवळ जाणारे असते. अधिक टक्केवारी ही ते चॉकलेट अधिक डार्क आणि कमी गोड असल्याचे सूचित करते.
व्हाईट चॉकलेट (White chocolate) हे तांत्रिकद़ृष्ट्या 'चॉकलेट' नसते. याचे कारण ते कोकोआ पावडर किंवा कोणत्याही घनपदार्थापासून बनवलेले नसते. त्यामध्ये केवळ कोकोआ बटर म्हणजेच कोकोआ वनस्पतीचे लोणी, दूध आणि साखरच असते. कोकोआ बटर हे एक 'व्हेजिटेबल फॅट' आहे. ते ऑलिव्ह ऑईल किंवा कॉर्न ऑईलसारखे नसते तर थेट कोकोआ फळातील बियांपासून काढलेले लोणी असते. व्हाईट चॉकलेटमध्ये कोकोआ बियांची पावडर नसल्याने त्याचा रंगही 'चॉकलेटी' नसतो!
हेही वाचा :