पुढारी ऑनलाईन डेस्क : चाॅकलेट म्हंटलं की, लहान मुलांचा आनंदी चेहरा नजरेसमोर येतो… चाॅकलेट म्हंटलं काॅलेजचा कट्ट्यावर एकमेकांशी लावलेली पैज लक्षात येतो… चाॅकलेट म्हंटलं की, व्हॅलेन्टाईल दिवशी गुलाबाच्या फुलाबरोबर दिलेली डेरी मिल्क आठवते… चाॅकलेट म्हंटलं की, भाऊबीज आणि रक्षाबंधनाला बहिणीला गिफ्टसोबत दिलेलं चाॅकलेटच मोठं पॅकेट आठवतं… एकंदरीत काय, तर चाॅकलेट म्हणजे आनंदाचा क्षण. चेहऱ्यावर सकारात्मकता आणि आत्मविश्वास आणण्याचा पदार्थ. पण, हे चाॅकलेट कुठून आलं असेल माहितीय? नाही ना? चला तर, चाॅकलेटचा इतिहास जाणून घेऊ…
मॅक्सिको हे शहर चाॅकलेटची जन्मभूमी आहे. चाॅकलेटवरील संशोधक असं सांगतात की, लॅटिन अमेरिकेपासून चाॅकलेटची सुरूवात झालेली आहे. त्याचा डायरेक्ट संबंध माया सभ्यतेशी आणि प्री-ओल्मेक सभ्यतेशी सांगितला जातो. एकुणात, ४००० वर्षांपूर्वीचा इतिहास चाॅकलेटला लाभलेला आहे. अहो! आज आपण रुपये, युरो, डाॅलर म्हणून चलनांचा वापर करतो ना… अगदी तसाच १४ व्या शतकातं चलन म्हणून चाॅकलेट वापरलं जायचं. म्हणजे कसं… कोको नावाच्या झाडावर चाॅकलेट तयार करण्याचं फळ येतं. कोकोच्या बिया या चलन म्हणून वापरल्या जायच्या. एका कोकोच्या बीमध्ये ससा खरेदी केला जायचा. लॅटिन अमेरिकतील काही परिसरांमध्ये १९ व्या शतकापर्यंत कोकोच्या बिया चलनात वापरल्या जात होत्या.
चाॅकलेट म्हंटलं की, माया सभ्यतेचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. कोकोपासून चाॅकलेट तयार करण्याची प्रकिया सुरू झाली. आज आपण चाॅकलेट खातो. पण, तुम्हाला माहिती नसेल… पूर्वी चाॅकलेट प्यायलं जायचं. आताच्या चाॅकलेटची चव ही गोड आणि मधूर होती. पण, पूर्वी चाॅकलेटची चव ही तिखट आणि कडू असायची. कोकोचं चाॅकलेट तयार करायचं झालं, तर पहिल्यांदा कोकोच्या बिया उन्हात वाळवल्या जायचा. नंतर त्या भाजल्या जायच्या. त्याच्या साली काढल्या जायच्या. त्यानंतर च्याचं बारीक चूर्ण म्हणजेच पावडर तयार केली जायची. त्यापासून चाॅकलेटची पेस्ट तयार केली जायची. १४ व्या शतकातही चाॅकलेट तयार करण्याची आजच्यासारखी आधुनिक पद्धत होती.
१५१९ मध्ये स्पेनच्या काॅर्टेजने मॅक्सिकोवर हल्ला केला. कोकोच्या चलनाची पद्धत जशीच्या तशी सुरूच ठेवली. पण, त्याच्या काळात महागाईनं टोक गाठलं होते. पूर्वी कोकोच्या एका बीवर एक ससा मिळायचा. आता तोच ससा कोकोच्या ३० बियांवर मिळायला लागला. पण, काॅर्टेजने चाॅकलेटला प्रतिष्ठा मिळवून दिली. चाॅकलेट इतकं प्रतिष्ठेचं झालं की, माया सभ्यतेमध्ये चाॅकलेटचं पदार्थ केवळ राज्यकर्ते, योद्धे, धार्मिक पदाधिकारी आणि उच्चवर्णीय लोकांच्यामध्ये चाॅकलेट खाल्लं जाऊ लागलं. चाॅकलेट खाण्याचा अधिकार केवळ याच लोकांना देण्यात आला. समजा, कुठल्या खालच्या स्तरावरील लोकांनी चाॅकलेट चुकून खाल्लंच. तर त्यांना कठोर शिक्षा केली जात होती.
चाॅकलेट हे औषध म्हणूनही वापरलं जातं होतं. युद्धात घायाळ झालेल्या सैनिकांच्या जखमा भरायच्या असतील, तर त्यांच्यी चाॅकलेटची पूड वापरली जातं. गंभीर आजारावर, ताप आल्यावर आणि अन्न पचविण्यासाठी पूर्वी वैद्य चाॅकलेट औषध म्हणून देत असत. चाॅकलेटचं महत्व इतकं वाढलं होतं की, उपवासाचा पदार्थ म्हणूनही चर्चने मान्यता दिली होती. मॅक्सिको, स्पेननंतर युरोपातही चाॅकलेट मोठ्या प्रमाणात पसरू लागलं. १६५७ च्या दरम्यान, इंग्लंडमध्ये जागोजागी चाॅकलेट हाऊस उघण्यात आली होती. काॅपी आज प्रतिष्ठेची मानली जाते. पण, त्याकाळी चाॅकलेट पेय प्रतिष्ठेचं होतं. क्रीडा आणि राजकारणातील प्रतिष्ठीत लोकं गप्पा मारताना, पत्ते खेळताना चाॅकलेट पेय प्यायलं जायचं.
खरंतर माया सभ्यतेत धार्मिक कार्यक्रमात चाॅकलेटचा बळी दिला जायचा. लग्न समारंभ, धार्मिक समारंभ, इतर सांस्कृतिक कार्यक्रमात चाॅकलेट भेट देण्याची प्रथा होची. आज आपण चाॅकलेट वेगवेगळ्या प्रकारांमध्ये पाहतो. चाॅकलेट कॅडबरी, चाॅकलेट ब्राऊनी, चाॅकलेट पोपसिकल्स, टी केक्स, कप केक्स आणि मफीन्स, अशा विविध प्रकारात चाॅकलेट आपल्याला खायला मिळतं. चाॅकलेट एक मिष्टान्न झालं आहे. पण, पहिलं आधुनिक पद्धतीचं चाॅकलेट खऱ्या अर्थाने १८५० मध्ये निर्माण झालं. जोसेफ फ्राई नावाच्या व्यापाऱ्याने कोकोच्या बियांची पावडर, त्यासोबत साखर, कोकोपासूनच तयार करण्यात आलेलं बटर याचा वापर केला. त्यातून 'साॅलिड' चाॅकलेटचा शोधलाला. नंतर डॅनियस पीटर, हेन्री नेसल यांनी दूधापासून चाॅकलेट बार तयार केला. त्यानंतर १८७९ मध्ये रुडाॅल्फ लिंडटे याने मशीनचा शोध लावला. तेव्हापासून चाॅकलेटचा तयार करण्याची सर्व पद्धतच बदलून गेली.