US : जगातील पहिले कारागृह… नव्हे… भूत महाल!

US : जगातील पहिले कारागृह… नव्हे… भूत महाल!

फिलाडेल्फिया : इस्टर्न स्टेट पेनिटेंटरीला जगातील पहिले कारागृह मानले जाते. ज्यावेळी हे कारागृह उभारले गेले, त्यावेळी ते आदर्शवत होते. अगदी खतरनाक कैद्यांसाठी जसे हवे, तशीच याची रचना केली गेली होती. हे कारागृह नंतर मॉडेलप्रमाणे झाले. एकवेळ या कारागृहात खतरनाक कैदी असायचे. आता मात्र त्याचे वर्णन केवळ भूत महाल असे केले जाते.

संबंधित बातम्या : 

डेली स्टारने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकन राज्य पेन्सिल्वेनियातील फिलाडेल्फिया शहरात हे कारागृह 1829 मध्ये सुरू झाले आणि 1971 पर्यंत चालू राहिले. हे कारागृह त्यातील कुख्यात कैद्यांबरोबरच त्यांची आयुष्यातील शेवटच्या टप्प्यात कशी परवड झाली, त्यामुळे देखील अधिक चर्चेत राहिले. प्रारंभी, हे कारागृह फक्त 250 कैद्यांसाठी होते. पण नंतर पाच दशकांच्या वाटचालीत ही संख्या वाढून 1 हजारवर पोहोचली.

कैद्यांसाठी हे कारागृह नरकापेक्षा कमी नव्हते, असे त्यावेळी म्हटले जायचे. या छोट्याशा कोठडीत दोन कैदी बंद केले जायचे. टीबीसारखे संसर्गजन्य आजार बळावल्याने 1900 मधील दशकाच्या प्रारंभी या कारागृहातील बर्‍याच कैद्यांचा मृत्यू झाला. हिवाळ्यात येथे तापमान उणे होत असे आणि यामुळे रक्तही गोठेल, अशी थंडी तेथे असायची. त्यामुळे देखील या कारागृहाच्या मूळ रचनेत अनेक बदल केले गेले.

इस्टर्न स्टेट 1971 मध्ये बंद झाले आणि त्यानंतर जवळपास 20 वर्षे ते रिकामे पडून होते. 1994 मध्ये मात्र हे कारागृह सर्वसामान्य जनतेकरिता पर्यटनाच्या उद्देशाने खुले केले गेले. आता या कारागृहाला अमेरिकेतील सर्वात मोठे भूत महाल म्हटले जाते. एका टी.व्ही. शोने कारागृहातील पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन केले आणि अजब घटनांबरोबरच भीतीदायक आवाज आणि काही आकृतींचा दाखला देण्यात आला, ज्यांना समजून घेणे कठीण असल्याचा त्यात उल्लेख होता.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news