Namibia : उल्कापिंडासारखे दिसणारे नामिबियातील जुने वाळवंट

Namibia : उल्कापिंडासारखे दिसणारे नामिबियातील जुने वाळवंट
Published on
Updated on

अँगोला : युरोपियन स्पेस एजन्सीतील अंतराळवीर अँड्रियास मोगन्सेनने जगातील सर्वात जुन्या वाळवंटाचे छायाचित्र ट्विट केले आहे. नामीब वाळवंटाचे हे छायाचित्र त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हे छायाचित्र थेट अंतराळातून टिपले आहे. अँड्रियासने आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, जगातील सर्वात जुने वाळवंट अंतराळातून एखाद्या उल्कापिंडासारखे दिसते.

संबंधित बातम्या : 

अँड्रियास युरोपियन स्पेस एजन्सीच्या आयरिस प्रोग्रॅमच्या माध्यमातून अंतराळात जाणारे पहिले अंतराळवीर आहेत. पोस्ट केलेल्या छायाचित्रासह त्यांनी ट्विटमध्ये हे वाळवंट 55 ते 80 दशलक्ष वर्षे जुने असेल, अशी टिपणी केली.

ते पुढे म्हणाले, 'वाळवंटाच्या पल्याड ब्रुकारोस पर्वत आहे. अंतराळातून पाहिले तर हे वाळवंट एखाद्या उल्कापिंडेसारखे दिसते; पण प्रत्यक्षात ते 4 किलोमीटर डायमीटरचे काल्डेरा आहे. जमिनीखालील स्फोटातून त्याची निर्मिती झालेली आहे. वाढत्या मॅग्मामुळे आतील पाणी अतिशय उष्ण झाल्याने ही परिस्थिती त्यावेळी उद्भवली होती'.

युरोपियन स्पेस एजन्सीच्या अधिकृत वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ईएसए अंतराळवीर अँड्रियास मोगेन्सन डेन्मार्कचे पहिले अंतराळवीर आहेत. त्यांचा जन्म 1976 मधील आहे. त्यांनी डेन्मार्कमधील कोपनहेगन येथील प्रशालेतून शिक्षण घेतले. एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर अमेरिकेतील ऑस्टिन येथे त्यांनी एरोस्पेस कारकिर्दीला सुरुवात केली. अँड्रियास यांनी ऑफशोर ऑईल रिग्स व टर्बाईन डेव्हलपमेंटमध्ये काही काळ सेवा बजावली. शिवाय, यंदा ऑगस्टमध्ये स्पेसएक्स क्रू ड्रॅगनवर आपल्या दुसर्‍या अंतराळ यात्रेत पायलट म्हणूनही काम पाहिले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news