थ्री-डी बायोप्रिंटिंगच्या सहाय्याने बनवल्या त्वचेच्या ऊती | पुढारी

थ्री-डी बायोप्रिंटिंगच्या सहाय्याने बनवल्या त्वचेच्या ऊती

तिरुवनंतपूरम ः जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार दरवर्षी भाजण्याच्या घटनांमुळे दहा लाखांपेक्षाही अधिक प्रकरणांमध्ये विशेष उपचाराची आवश्यकता असते. भाजल्यामुळे क्षतिग्रस्त झालेली त्वचा शल्यचिकित्सेच्या सहाय्याने हटवून आणि त्वचेच्या प्रत्यारोपणाने तिची पुननिर्मिती करून भाजण्याच्या खोल जखमांवर उपचार केला जातो.

आता अशा उपचाराला मदत करणारे एक तंत्र भारतीय संशोधकांनी शोधले आहे. त्यांनी थ—ी-डी बायोप्रिंटरच्या सहाय्याने त्वचेच्या ऊती निर्माण करण्यात यश मिळवले आहे. श्री चित्रा तिरुनल इन्स्टिट्यूट फॉर मेडिकल सायन्सेज अँड टेक्नॉलॉजी या तिरुवनंतपूरममधील संस्थेच्या संशोधकांनी हे तंत्र शोधले. थ—ी-डी बायोप्रिंटिंगमध्ये उपयुक्त पॉलिमर-आधारित बायोइंकचा वापर करून सेल लेअर आर्किटेक्चरला डिझाईन करण्यात आले आहे.

बायोइंक तयार करण्यासाठी डायथायलामिनोइथायल सेल्युलोजच्या पावडरीच्या रूपात एक स्थिर नैसर्गिक घटक एल्गिनेटच्या द्रावणात मिसळण्यात आले. हे सोल्युशन ऊतींना एकमेकींना जोडणार्‍या जिलेटिन द्रावणाशी मिसळले गेले. बायोइंकचा वापर रुग्णाच्या फायब—ोब्लास्ट, एपिडर्मल केराटिनोसाईटस् आणि त्वचेच्या ऊतींमध्ये आढळणार्‍या पेशींना कॅप्सुलीकृत करण्यासाठी करण्यात आला. संशोधकांनी त्वचेच्या ऊतींच्या विविध स्तरांना बायोप्रिंट केले.

Back to top button