मॅट्रिमोनी साइटवरील लज्जास्पद जाहिरात व्हायरल! ब्रा, कंबरेच्या आकाराचा उल्लेख | पुढारी

मॅट्रिमोनी साइटवरील लज्जास्पद जाहिरात व्हायरल! ब्रा, कंबरेच्या आकाराचा उल्लेख

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जीवनसाथी शोधण्यासाठी लोक अनेक माध्यमांचा वापर करतात. नातेवाईक, ओळखीच्या व्यक्तींकडून अथवा मॅट्रिमोनी साइट्सवर लोक वधू-वर पाहिजेत म्हणून जाहिराती देतात. अशातच मॅट्रिमोनी साइट्सवर दिलेली एक जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, ही जाहिरात आक्षेपार्ह आणि लज्जास्पद असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. लोक सहसा वर-वधू शोधण्यासाठी जाहिराती देऊन वय, शिक्षण, उंची, रंग कोणता हवा अशी मागणी करत असतात. मात्र, एका व्यक्तीने अशी काही अपेक्षा व्यक्त केली आहे की यामुळे लोकांना सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

वधूच्या शोधात असलेल्या एका व्यक्तीने मॅट्रिमोनी साइटवर वयाचा उल्लेख करण्याशिवाय भावी पत्नी कशी असावी याचा उल्लेख केला आहे. तिची ब्रा आणि कंबरेचा आकार आणि एवढेच नाही तर वधूच्या पायाच्या आकाराचा उल्लेख त्याने जाहिरातीमधून केला आहे. तिची उंची किती असावी याबाबतही त्याने स्पष्टपणे उल्लेख केला आहे. ही जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या लज्जास्पद प्रकारामुळे अनेकजणांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.

लिबरल, कंझर्व्हेटिव्ह मूल्ये जपणारी वधू हवी, असेही त्याने पुढे म्हटले आहे. एका युजरने हा मुलगा लेडीज टेलर आहे काय? असा सवाल केला आहे. आणखी एकाने हा ब्लाउज पीस असलेली साडी शोधत आहे का? असा सवाल करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मुलगी गोरी हवी, सडपातळ अथवा मध्यम बांधा, शिक्षित, अशा ‘वधू पाहिजे’ जाहिराती देऊन अपेक्षा व्यक्त केल्या जातात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका लज्जास्पद जाहिरातीने वाद निर्माण झाला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : भारतातील पहिलं पॉड हॉटेल सुरू झालय मुंबई सेंट्रलला | Pod Hotel Mumbai | Mumbai Travel Vlog

Back to top button