CEO Dilip Swamy : लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचार्‍यांनाच कामावर बोलाविणार | पुढारी

CEO Dilip Swamy : लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचार्‍यांनाच कामावर बोलाविणार

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोनापेक्षा कितीतरी पटीने जास्त घातक असणार्‍या ओमिक्रॉनची भीती जगभरात पसरत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाचे दोन लस टोचून घेतलेल्या कर्मचार्‍यांनाच यापुढे कामावर हजर करून घेण्यात येणार असल्याची माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. (CEO Dilip Swamy)

Siddheshwar Sugar Factory च्या निवडणुकीसाठी 136 जणांनी नेले अर्ज

सीईओ स्वामी यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. माझी वसुंधरा मोहिम व कोरोना लसीकरणासाठी पुन्हा एकदा व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कोरोना लसीकरणासाठी घरोघरी व वाडी वस्तीवर मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. लसीकरण न झालेल्या कुटुंबास शासकीय योजनेचा लाभ बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागास अधिक सतर्क राहण्याच्याही सूचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (CEO Dilip Swamy)

कोरोना लसीकरण व माझी वसुंधरा मोहिमेची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यातील 706 ग्रामपंचायतीमध्ये 1 डिसेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता जनजागृती रॅली काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ग्रामसेवक, जि.प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या आहेत. पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता माझी वसुंधरा मोहीम व कोरोना लसीकरण या दोन्ही विषयावर निबंध स्पर्धा आयोजिली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत.

हेही वाचा

Back to top button