सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांत जल्ह्यातील 6 तालुक्यात भूजल पातळी घटली

सातारा जिल्ह्यातील 6 तालुक्यांत जल्ह्यातील 6 तालुक्यात भूजल पातळी घटली
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात जावली, कराड, सातारा व वाई तालुक्यांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला असला तरी पाटण, कोरेगाव, खटाव, माण, फलटण, खंडाळा व महाबळेश्वरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे खटाव, माण, फलटण, रेगाव, पाटण व महाबळेश्वर तालुक्यांतील भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे 147 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे.

भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील वाई, सातारा, जावली, माण, कराड, खंडाळा, कोरेगाव, खटाव तालुक्यातील विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या तालुक्यातील विहिरींच्या पाणी पातळीत 0 ते 0.45 मीटरपर्यंत पाण्याची वाढ झाली आहे. तर फलटण, पाटण व महाबळेश्वर तालुक्यामध्ये 0.66 मीटर इतकी घट झाली आहे. जिल्ह्यातील 106 विहिरींंपैकी 40 विहिरींच्या पाणीपातळीत घट झाली आहे.
जिल्ह्यातील भूजल पातळी खालावल्याने महाबळेश्वर 8, फलटण 30, पाटण 25, फलटण 30, खटाव 31, कोरेगाव 23 अशा मिळून 147 गावांमध्ये संभाव्य पाणी टंचाईची शक्यता आहे.

यामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील आंब्रळ, मजरेवाडी, टाकेवाडी, कुरोशी, राजपुरी, कुंभरोशी, कुमठे, आचली. फलटण तालुक्यात आंदरूड, वडले, आळजापूर, कापशी, सासवड, आरडगाव, चव्हाणवाडी, सासवड, घाडगेवाडी, मुळीकवाडी, नांदल, घाडगेमळा, शेरेचीवाडी, कुरवली खुर्द, मांडवखडक, विंचुर्णी, मानेवाडी, फरांदवाडी, तावडी, खडकी, वाघोशी, पिराचीवाडी, शेरेचीवाडी, ताथवडा, वाठार निंबाळकर, मिरढे, शेरेशिंदेवाडी, धुमाळवाडी, दुधेबावी या गावांचा समावेश आहे.

खटाव तालुक्यातील मांजरवाडी, मोळ, डिस्कळ, गारवडी, उंबरमळे, दरजाई, कातळगेवाडी, भांडेवाडी, भुरकवाडी, डांबेवाडी, कातरखटाव, येलमरवाडी, एनकूळ, कणसेवाडी, खातवळ, पळसगाव, अंभेरी, कोकराळे, जायगाव, रेवलकरवाडी, अंबवडे, कामती, निमसोड, अनफळे, कान्हरवाडी, कानकात्रे, पडळ, ढोकळवाडी, हिवरवाडी, कलेढोण, मायणी या गावांमध्ये टंचाईची शक्यता आहे. कोरेगाव तालुक्यातील भक्तवडी, भावेनगर, गिधेवाडी, जगतापवाडी, कोलवडी, पळशी, परतवडी, पिंपोडे बुद्रूक, सातारारोड, सोनके, भांडारमाची, भाटमवाडी, बोधेवाडी, बोरजाईवाडी, चिमणगाव, रामोशीवाडी, सांगवी, एकंबे, खिरखिंडी, सोनगाव, शेल्टी, शिरंबे या गावात पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे.

माण तालुक्यात गरडाचीवाडी, वारूगड, खोकडे, मोगराळे, अनभुलेवाडी, बिजवडी, जाधववाडी, पाचवड, राजवडी, तोंडले, पांगरी, विरोबानगर, वावरहिरे, येळगाव, वडगाव, भांडवली, बोडके, कासारवाडी, मलवडी, शिरवली, देवापूर, शिरताव, कारखेल, शंभूखेड, हवालदारवाडी, इंजबाव, खडकी, वरकुटे म्हसवड, भाटकी येथे टंचाईची शक्यता आहे.

पाटण तालुक्यातील चवलीवाडी, नेरळे, झाकडे, केळोली, खराडेवाडी, बोरगेवाडी, धनगरवाडी, फडतरवाडी, डोंगलेवाडी, गवळीनगर, कोकीसरे, बगलवाडी, भोसगाव, जाधववाडी, जानुगडेवाडी, कोळेकरवाडी, मालदन, मंद्रुळकोळे खुर्द, रेठरेकरवाडी, शिद्रुकवाडी,
सुतारवाडी, टेळेवाडी, तुपेवाडी, उमरकांचन या गावांमध्ये पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news