जिथे सूर्यास्तच होत नाही, तिथे लोक वेळा कशा पाळतात? | पुढारी

जिथे सूर्यास्तच होत नाही, तिथे लोक वेळा कशा पाळतात?

लंडन : जगभरात असे 6 देश आहेत, जिथे बर्‍याच दिवसांपर्यंत सूर्यास्तच होत नाही. यातील काही दिवसांत 70 दिवसांपर्यंत सूर्यास्त होत नाही. 24 तास सोडून द्या, कित्येक दिवस तेथे सूर्य तळपताच असतो. अशा परिस्थितीत तेथील लोक वेळा कशा पाळतात, जगतात कसे, हे एक कोडेच आहे.

संबंधित बातम्या : 

एरव्ही, रात्र व दिवस हे नेहमी प्रकृतीच्या नियमाने होत असतात. सूर्य जसा उगवतो, तसा मावळतो देखील. नॉर्वेसारख्या देशात 76 दिवस सलग सूर्य तळपत राहतो. मे पासून जुलैपर्यंत तेथे सूर्यास्तच होत नाही. आईसलँड या ग्रेट बि—टनमधील युरोपच्या सर्वात मोठ्या आयलंडमध्ये मे पासून जुलैपर्यंत सूर्योदय असतो. या देशात पर्यटन करायचे असेल तर केव्हाही झरे, ग्लेसियर व जंगलाचा आनंद लुटता येऊ शकतो.

कॅनडाच्या नुनावूत शहरातही 2 महिन्यांपर्यंत सूर्यास्त होत नाही. यातील काही भागात तापमान 50 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचते. हिवाळ्यात मात्र महिनाभर पूर्ण अंधार असतो. स्वीडनमध्येही काहीसे असेच चित्र असते. मेच्या प्रारंभापासून ऑगस्टच्या अखेरपर्यंत रात्री सूर्यास्त होतो आणि 4 च्या दरम्यान सूर्योदय होतो. अमेरिकेतील अलास्का येथेही सूर्य रात्रीत केवळ 51 मिनिटांसाठी मावळतो. मे ते जुलै यादरम्यान सूर्याचे दर्शन घडते. मात्र, नोव्हेंबरच्या प्रारंभापासून 30 दिवसांपर्यंत सूर्य दिसून येत नाही. याला पोलर नाईट असेही म्हणतात. फिनलंडमध्येही सलग 73 दिवस सलग सूर्य तळपत राहतो. त्यामुळे येथील लोकांच्या झोपेच्या सवयी देखील वेगळ्या असतात. या लोकांचे बायोलॉजिकल क्लॉक सेट झालेले असते आणि त्यानुसारच त्यांचा दिनक्रम ठरत असतो.

हेही वाचा : 

Back to top button