मायक्रोसॉफ्ट आजपासून करणार कर्मचारी कपात – मीडिया रिपोर्ट्स, तर मायक्रोसॉफ्टचे प्रवक्ते म्हणाले… | पुढारी

मायक्रोसॉफ्ट आजपासून करणार कर्मचारी कपात - मीडिया रिपोर्ट्स, तर मायक्रोसॉफ्टचे प्रवक्ते म्हणाले...

पुढारी ऑनलाइन डेस्क : टेक क्षेत्रातील जगप्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्ट आजपासून कर्मचारी कमी करणे सुरू करेल, असे वृत्त मंगळवारच्या मीडिया रिपोर्ट्सच्या हवाले एनडीटीव्हीने दिले आहे. सध्याची वाईट आर्थिक परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी कंपनी हेडकाउंट पार करणे सुरू ठेवेल असे अहवालात म्हटले आहे. मात्र, या वृत्ताला मायक्रोसॉफ्टकडून दुजोरा मिळालेला नाही.

संगणक उद्योगातील दिग्गज बुधवारपासून लवकरच त्यांच्या अभियांत्रिकी विभागांमध्ये टाळेबंदीची घोषणा करू शकते, असे वृत्त ब्लूमबर्ग न्यूजने दिले आहे.

मायक्रोसॉफ्ट ही वॉशिंग्टन राज्य-आधारित कंपनी आहे. इंडस्ट्री ट्रॅकर्सनुसार मायक्रोसॉफ्टमध्ये दोन लाख 20 हजार पेक्षा जास्त कामगार आहेत. कंपनीने यापूर्वी दोन वेळा कर्मचा-यांची संख्या कमी केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार मायक्रोसॉफ्ट साधारणपणे आपल्या गेल्या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांच्या कमाईचा अहवाल देण्याच्या एक आठवड्यापूर्वी नवीन टाळेबंदीची घोषणा करू शकते.

मात्र या सर्वांबाबत मायक्रोसॉफ्टकडून अद्याप कोणतीही पुष्टी करण्यात आली नाही. तसेच मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी एएफपीला सांगितले, कंपनी अफवांवर कोणतीही टिप्पणी करणार नाही.

वेडबश विश्लेषक डॅन इव्हस यांनी गुंतवणूकदारांसाठी काही नोट्स सादर केल्या आहेत. त्यात त्यानी म्हटले आहे की गेल्या काही आठवड्यात सेल्सफोर्स अॅमेझॉन या सारख्या दिग्गजांकडून मोठ्या संख्येने कर्मचारी कपात करण्यात आली आहे. संपूर्ण टेक क्षेत्रात आणखी 5 ते 10 टक्के कर्मचारी कपात होऊ शकते.

इव्हस यांनी परिस्थितीवर भाष्य करताना लिहिले आहे की, ब-याच टेक कंपन्यांनी आधी 1980 च्या रॉक स्टार्सप्रमाणे पैसे खर्च करत होत्या. आणि आता सूक्ष्म आर्थिक परिस्थीतीत त्यांना खर्चावर नियंत्रण आणणे अत्यावश्यक झाले आहे.

हे ही वाचा :

उत्तराखंडात आणखी ‘5 जोशीमठ’ संकटाच्या छायेत

गळा चिरला तरी संघ कार्यालयात जाणार नाही : राहुल गांधी

Back to top button