Coconut milk tea : नारळाच्या दुधाचाही बनवतात चहा! | पुढारी

Coconut milk tea : नारळाच्या दुधाचाही बनवतात चहा!

लंडन : जगाच्या पाठीवर चहाचे अनेक प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये आपण नेहमी पितो तशा चहाशिवाय ग्रीन टी, ब्लॅक टी, सफरचंदाचा चहा, निळ्या गोकर्णीचा चहा वगैरे अनेक प्रकार असतात. मात्र, तुम्ही कधी नारळाच्या दुधाचाही चहा (Coconut milk tea) असतो हे ऐकले होते का? नारळाच्या दुधाचा वापर आपण सोलकढीसारख्या काही पदार्थांमध्ये करीत असतो; मात्र त्याचाही चहा बनवता येतो, हे आपल्या ऐकिवात नव्हते. मात्र, असाही चहा बनवला जातो व तो स्वादिष्ट आणि आरोग्यदायीही असतो, हे विशेष!

नारळाचे दूध सर्वसाधारणपणे खूप आरोग्यदायी असते. त्यामुळे हे दूध घालून चहा केल्यास आरोग्याला कोणतीही हानी होत नाही. नारळपाणी पिणे अनेकांना आवडते. मात्र, काही लोकांना ते आवडत नाही किंवा त्याने त्रास होतो. अशावेळी तुम्ही नारळ पाण्याऐवजी दुधाचा आहारात समावेश करू शकता. नारळ चहा हे एक कॅफिनयुक्त पेय आहे. नारळाच्या दुधात हिरव्या किंवा काळ्या चहाचे मिश्रण करून बनवले जाते. उष्णकटिबंधीय भागात राहणारे लोक जेथे नारळ भरपूर पिकतात, तिथे हे पेय जास्त बनवले जाते. नारळाच्या दुधात सॅच्युरेटेड फॅट भरपूर असते. यामध्ये लॉरिक अ‍ॅसिड, मॅग्नेशियम, लोह, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, फायबर इत्यादींचे प्रमाण जास्त असते.

नारळाचा चहा पिणे आरोग्यासाठी चांगले असते. हे एक सुपर फूड आहे, जे वजन कमी करते आणि प्रतिकारकशक्ती वाढवते. जेव्हा तुम्ही नारळाच्या दुधाच्या चहामध्ये ग्रीन टी बॅग टाकता तेव्हा त्यात पॉलिफेनॉलिक संयुगे आणि इतर सक्रिय घटक असतात. ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. नारळात भरपूर फॅट-बस्टिंग गुणधर्म असतात. तसेच त्यात कॅलरीज खूप कमी असतात. पाण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

हेही वाचा : 

Back to top button