गुगलच्या डिजिटल पेमेंट अ‍ॅपसाठी सिक्युरिटी फिचर! | पुढारी

गुगलच्या डिजिटल पेमेंट अ‍ॅपसाठी सिक्युरिटी फिचर!

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : येथील प्रगती मैदनावरील गुगल फॉर इंडिया 2022 महोत्सवात गुगल सीईओ सुंदर पिचई यांनी सोमवारी अनेक उपक्रम व नवीन फिचर्सची घोषणा केली. गुगल सेवेतील अनेक बदलही जाहीर केले. गुगलच्या डिजिटल पेमेंट अ‍ॅपसाठी एक नवे सिक्युरिटी फिचर लाँच केले. व्यवहाराची इत्थंभूत माहिती त्यातून मिळणार आहे.

या उपक्रमाची घोषणाही पिचई यांनी केली. आर्टििशिअल इन्टेलिजन्स आणि मशिन लर्निंगच्या सहाय्याने एक नवे मॉडल तयार करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्याशिवाय डिजिटल डॉक्युमेंट्स अ‍ॅप डीजीलॉकरमध्येही अपडेशन केले आहे. गुगल शेअरिंग अ‍ॅप फाईल्ससाठी ते इन्टिग्रेट करण्यात आले आहे.

शेतीसाठीही मॉडेल

भारतातील कृषी क्षेत्राला नवी दिशा देण्यासाठी रिमोट सेन्सिंग क्षमतांचा वापर करून गुगलने एक मॉडेल तयार केले आहे. शेतीशी संबंधित कामे यातून मोठ्या प्रमाणावर केली जाऊ शकतील. लवकरच गुगलकडून यूट्यूब कॉर्सेसही लाँच केले जाणार आहेत.

Back to top button