US Earthquake : अमेरिकेतील टेक्सासला भूकंपाचे धक्के; शहराच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली भूकंपाची नोंद | पुढारी

US Earthquake : अमेरिकेतील टेक्सासला भूकंपाचे धक्के; शहराच्या इतिहासातील सर्वात शक्तीशाली भूकंपाची नोंद

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील टेक्सास शहरात शुक्रवारी संध्याकाळी भूकंपाचे धक्के बसले आहेत. अमेरिका भूगर्भीय सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ही ५.४ रिश्टर इतकी आहे. टेक्सासच्या इतिहासातील हा सर्वात शक्तीशाली भूकंप म्हणून नोंदवला गेला आहे. टेक्सासच्या पश्चिम भागात ज्या ठिकाणी हा भूकंप झाला, ते तेल उत्खननाचे ठिकाण आहे. यामध्ये अद्यापतरी कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

या भूकंपाचा केंद्रबिंदू हा पश्चिम टेक्सासमधील मिडलँड शहराच्या उत्तर-वायव्येपासून 22 किलोमीटर अंतरावर ९ किलोमीटर खोलीवर आहे. या भूकंपानंतर मिडलँडच्या हवामान विभागाच्या कार्यालयाने ट्विट केले आहे की, हा टेक्सासच्या इतिहासातील चौथा सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.

कोलोरॅडोमधील यूएसजीएसच्या राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्रातील भूभौतिकशास्त्रज्ञ जना पर्स्ले यांनी सांगितले की, हवालानुसार, टेक्सासमधील अमरिलो आणि एबिलेनेपासून पश्चिमेकडे कार्ल्सबाड, न्यू मेक्सिकोपर्यंत या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. गेल्या महिन्यात पश्चिम टेक्सासमध्ये अशाच तीव्रतेचा भूकंप झाला होता. १६ नोव्हेंबरचा तो भूकंप ५.३ रिश्टर इतका मोजला गेला आणि त्याचा केंद्रबिंदू मिडलँडच्या पश्चिमेला सुमारे 153 किलोमीटर अंतरावर होता.

हेही वाचा:

Back to top button