

वाळवा; धन्वंतरी परदेशी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफझलखान वधानंतर वाळव्याला 17 डिसेंबर 1659 रोजी भेट दिली होती. या ऐतिहासिक भेटीला शनिवारी 363 वर्षे पूर्ण होत आहेत. येथील उमराणी घराण्यामध्ये मिळालेल्या ऐतिहासिक कागदपत्रामध्ये हा पुरावा आढळतो.
वाळवा गावाला प्राचीन इतिहास आहे. वाल्मिकी या शब्दाचा अपभ्रंश होऊन वाळवा हे नाव पडल्याचे सांगितले जाते. पूर्वीच्या काळचे व्यापारी मार्गावरचे हे प्रमुख गाव आहे. गावात जुन्या इतिहासाच्या पाऊलखुणा आढळतात. वाळव्याला भुईकोट किल्ला होता. या किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सन 1752 मध्ये सुरू असल्याची नोंद आहे. गावात ढाल, तलवार, वाघनखे, तोफांचे गोळे, लहान तोफा यासारखी ऐतिहासिक शस्त्रे मिळाली होती. बहामनी, आदिलशाही आणि मुघलकालिन नाणीही मिळाली आहेत.
भारत इतिहास संशोधन मंडळाचे संशोधक मियाँ सिकंदरलाल आत्तार यांनी यापैकी काही वस्तू मंडळाला दिल्या होत्या. थोरात सरकार या वतनाचा कारभार पहात होते. त्याकाळी थोरातांनी कर्नाटकमधील बदामी शहर स्वारी करून लुटले. त्यामध्ये मिळालेल्या ताम्रपटाच्या आधारे आजही भावईचा उत्सव साजरा केला जातो.
अधिक वाचा :