MVA morcha : आज महामोर्चासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल | पुढारी

MVA morcha : आज महामोर्चासाठी मुंबईतील वाहतुकीत बदल

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  भायखळ्यातील रिचर्डसन अॅन्ड कुडास कंपनी येथून निघणाऱ्या महाविकास आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी शनिवारी सकाळी १० वाजल्यापासून मोर्चा समाप्तीपर्यंत वाहतुक व्यवस्थेत बदल केला आहे. ( MVA morcha)

 MVA morcha : वाहतुकीसाठी बंद मार्ग :-

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडने दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी गॅस कंपनी चिंचपोकळी पुलावरून ऑर्थर रोड-सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल – डॉ. दादासाहेब भंडकमकर मार्ग (लॅमिग्टन रोड ) ओपेरा हाऊस महर्षी कर्वे रोडचा (क्वीन्स रोड) वापर करावा. किंवा सात रस्ता सर्कल – मुंबई सेंट्रल-ताडदेव सर्कल – नाना चौक एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा सुध्दा वापर करू शकतात.

२) भायखळा येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता डॉ. बी. ए. रोड खडा पारसी नागपाडा जंक्शन- दोन टाकी जंक्शन जे. जे. जंक्शन महम्मद अली रोड याचा वापर करावा. किंवा नागपाडा जंक्शन मुंबई सेंट्रल – ताडदेव सर्कल- नाना चौक- एन. एस. पुरंदरे मार्ग या पर्यायी मार्गाचा सुध्दा वापर करू शकतात.

३) भायखळा / जिजामाता उदयान (राणीची बाग) येथुन दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी संत सावता ने मुस्तफा बाजार -रे रोड रिलप रोड- बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पुढे पी.डीमेलो रोडने पुढे सी.एस.एम.टी. कडुन मार्गाने इच्छीत स्थळी.

४) पटेल व लालबाग येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता बावला कंम्पाऊंड टी.बी. कदम मार्गाने व्होल्टस कंपनी उजवे वळण तानाजी मालुसरे मार्ग अल्बर्ट जंक्शन- उजवे वळण बॅरिस्टर नाथ पै मार्गाचा वापर करावा.

५) मध्य मुंबई कडून दक्षिण मुंबईकडे जाण्यासाठी चार रस्ता आर. ए. किडवाई मार्गाने बॅरिस्टर नाथ पै मार्गाने पी.डीमेलो रोडचा वापर करावा.
६) नवी मुंबई, पुणे, ठाणे व नाशिक येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता देवनार आयओसी जंक्शन पूर्व मुक्त मार्ग (एरीींशीप त्रीशश, रू) पी. डिमेलो रोडचा वापर करावा किंवा नवी मुंबई व पुणे येथून दक्षिण मुंबईकडे जाण्याकरीता चेंबुर पांजरपोळ जंक्शन पूर्व मुक्त मार्ग (एरीींशीप ीशश, रू) पी. डिमेलो रोड याचा वापर करावा.

७) दक्षिण मुंबई येथून उत्तर आणि पश्चिम मुंबई करीता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन जगन्नाथ शंकर शेठ रोड- प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाण पुल मरीन ड्राईव्ह मार्ग याचा वापर करावा.

८) दक्षिण मुंबई कडून मध्य मुंबई तसेच नवीमुंबई, पुणे, ठाणे व नाशिक करीता पी.डिमेलो रोडचा वापर करून पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) मार्गेइच्छीतस्थळी जाऊ शकतात.

९) दक्षिण मुंबईकडून मध्य मुंबई करीता महिर्षी कर्वे रोड / मरिन ड्राईव्ह – ओपेरा हाऊस –
लॅमिंटन रोड मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा. महिर्षी कर्वे रोड / मरिन ड्राईव्ह नाना चौक ताडदेव सर्कल मुंबई सेंट्रल सात रस्ता चिंचपोकळी किंवा डॉ. बी. ए. रोड याचा वापर करावा.

(१०) सीएसएमटी स्टेशनकडुन पायधुनी, भायखळा, नागपाडा येथे जाण्याकरीता महापालिका मार्ग मेट्रो जंक्शन एल. टी. मार्ग चकाला डावे वळण जि. जे. जंक्शन दोन टाकी नागपाडा जंक्शन खडा पारसी जंक्शन मार्गे इच्छीतस्थळी जाऊ शकतात.

पार्किंगचे ठिकाणे

१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स (सीएसएमटी) प्लॅटफॉर्म क्र. १८ येथे ५० बस
२. बॅलाई इस्टेट येथे ५० बस
३. कर्नाक बंदर बीपीटी न्ड पार्किग येथे ७० बस
४. कल्याण स्ट्रिट सेंट बस डेपो जवळ, मस्जीद बंदर येथे ५० बस
५. पी. डिमेलो रोड, कर्नाक बंदर येथे ५० बस ६. भाऊचा धक्का ( एमटूएम फेरी) प्रिंन्सेस डॉक, मुंबई पोर्ट ट्रस्ट, माझगाव, येथे ७० बस
७. बिपीटी पे न्ड पार्क कॉटन ग्रीन स्टेश- नजवळ २०० बस
८. फॅशन स्ट्रीट येथे ४० बस
९. टाटा पॉवर कंपनी, कर्नाक बंदर येथे १४० बस
१०. मुंबई रेल्वे आयुक्तालयासमोरील रस्ता, वाडी बंदर येथे ४० बस

हेही वाचा

Back to top button