Himalaya : प्रदूषणात घट; बिहारमधून दिसत आहे हिमालय | पुढारी

Himalaya : प्रदूषणात घट; बिहारमधून दिसत आहे हिमालय

पाटणा : कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात रहदारी ठप्प झाली होती. त्यामुळे अर्थातच प्रदूषणातही घट होऊन द़ृश्यस्पष्टताही वाढली होती. त्यावेळी पंजाबच्या जालंधरमधून हिमालयातील (Himalaya) धौलाधार पर्वतराजीचे दर्शन होत होते. आताही प्रदूषणात घट झाल्याने बिहारमधून हिमालयाचे दर्शन घडत आहे.

बिहारच्या कोसी भागातून हिमालय (Himalaya)पर्वतरांगांतील माऊंट एव्हरेस्ट, ग्रेटर हिमालय व शिवालिक रेंजचे शिखर दर्शन होत आहे. प्रदूषणात घट झाल्यामुळे अनेक वर्षांनंतर सुपौल जिल्ह्यातील सरायगड येथून 180 किलोमीटर अंतरावर माऊंट एव्हरेस्ट परिसरातील हिमाच्छादित शिखरे दिसू लागली आहेत. ऑक्टोबरपर्यंत झालेल्या पावसामुळे धूलिकण जमिनीवर आले आहेत. आकाश निरभ्र झाल्याने नोव्हेंबरपर्यंत ही शिखरे दिसली होती. बीएनएमयूचे भूगोल विभागाचे माजी प्रमुख शिवमुनी म्हणाले, छायाचित्रातील निळेशार शिखरे शिवालिकची आहेत.

हेही वाचा : 

Back to top button