Marine Commandos :नौदलाच्या सर्वांत घातक मार्कोस कमांडो दलात होणार लढवय्या महिलांचा समावेश

Marine Commandos
Marine Commandos

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : भारतीय नौदलाच्या मार्कोस आणि हवाई दलाच्या गरुडा या विशेष कमांडो पथकात महिला कमांडोंचा लवकरच समावेश केला जाणार आहे. मात्र त्यासाठी त्यांना अतिशय कठोर समजल्या जाणाऱ्या चाचण्यांतून यशस्वीपणे जावे लागणार आहे. भारतीय सैन्य (Marine Commandos) दलासाठी हा ऐतिहासिक निर्णय असून जगातील सर्वात घातक समजल्या जाणाऱ्या या घातक कमांडो फोर्सचा लौकिक वाढणार आहे.

भारतीय सैन्य दलाच्या तिन्ही शाखांत महिलांच्या प्रतिनिधित्वाबाबत (Marine Commandos) एकेक निर्णय घेत आता देशाचे सैन्य दल घातक युद्धकौशल्य असणाऱ्या महिलांना आणखी एक आव्हान खुणावणार आहे. ताज हॉटेलवरील हल्ल्यापासून भारतीय नौदलाचे मार्कोस कमांडो जगाला माहिती झाले. या कमांडोंनी पाकिस्तानी अतिरेक्यांचा मुकाबला करताना हाती घेतलेले ऑपरेशन ब्लॅक टोर्नेडो जगातील युद्धकौशल्यातील मानाचे पान समजले जाते. विविध देशांच्या कमांडो प्रशिक्षणात त्याचा सातत्याने गौरवाने उल्लेख केला जातो. अमेरिकेच्या मरिन कमांडो आणि ब्रिटनच्या रॉयल नेव्ही कमांडो युनिटखालोखाल भारताच्या मार्कोसचे नाव घेतले जाते. या मार्कोस दलात आता महिला कमांडो सामील होणार आहेत. मात्र या दलात समाविष्ट होण्यासाठी अत्यंत कठोर अशा चाचण्यांतून जावे लागणार आहे. सर्वच कमांडोंना या चाचण्या अत्यावश्यक असतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांचे प्रमाण अवघे २० टक्के असते. मार्कोसने आतापर्यंत श्रीलंकेतील लिट्टेविरोधी मोहीम, जम्मू काश्मीरमधील अतिरेकीविरोधी मोहिमा, हिंद महासागरातील समुद्री चाचेविरोधी मोहिमा, लेहमधील तैनाती आदी मोहिमा हाताळल्या आहेत. त्यातील ताज हॉटेल कारवाई मोहीम सर्वाधिक प्रकाशझोतात आली. नौदलाच्या पाठोपाठ हवाई दलाच्या गरुड या कमांडो दलातही महिला कमांडोंच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबाबतच्या निर्णयावर लवकरच अंतिम शिक्कामोर्तब होणार

 Marine Commandos : मार्कोसविषयी जाणून घ्या

• नाव : मरिन कमांडो फोर्स अर्थात माकोंस
• स्थापना : फेब्रुवारी १९८७
• स्थापना स्थळ : आयएनएस अभिमन्यू,
मुंबई • कमांडोंची संख्या किमान २ हजार
(अनधिकृत )
• जबाबदारी समुद्र, हवाई आणि जमिनीवर विशेष ऑपरेशन हाताळणे • कौशल्य : हवाई हल्ले, सागरी हल्ले, जमिनीवरील हल्ले, सागरी गस्त, अपहृत सुटका, संयुक्त विशेष ऑपरेशन • मार्कोसचे तळ : मुंबई, विशाखापट्टणम, गोवा, कोची आणि पोर्ट ब्लेअर

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news