Nirmala Sitharaman : रुपयाच्या अवमुल्यनावरून संसदेत खडाजंगी, वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय म्हणाल्या…

Nirmala Sitharaman : रुपयाच्या अवमुल्यनावरून संसदेत खडाजंगी, वाचा अर्थमंत्री निर्मला सीतारमण काय म्हणाल्या…
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा; रुपयाच्याअवमूल्यनावरून सोमवारी संसदेत सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये खडाजंगी जोरदार बघायला मिळाली. काँग्रेस खासदाराने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी विरोधकांना टीकास्त्र सांगितले. डॉलर तसेच रुपयामध्ये चढ-उतार होत सोडले. भारतीय रुपया अन्य चलनाच्या तुलनेत मजबूत स्थितीत आहे, असे अर्थमंत्र्यांनी सदनाला असल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा प्रभाव पडू नये यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने परकीय चलन साठ्याच्या वापर केला आहे. (Nirmala Sitharaman )

जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था असलेल्या देशापैकी सर्वात अधिक प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक भारतात झाली आहे. भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. संसदेतील काही लोक देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर जळत आहेत. भारत सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असे सीतारामण म्हणाल्या.रुपयाचे सतत अवमूल्यन होत आहे; मात्र त्याची काहीही चिंता नाही. काँग्रेस सरकारमध्ये जेव्हा डॉलरच्या तुलनेत रुपया ६६ रुपयांवर होता तेव्हा भाजपचे नेते म्हणायचे की रुपया आयसीयूत गेला आहे. आयसीयूच्या पुढे दोन मार्ग असतात. एक मार्ग बरे होऊन घरी येण्याचा आणि दुसरा थेट शवागाराचा. आता रुपया तर थेट शवागारात गेला आहे. मला अर्थमंत्र्यांना विचारायचे आहे की रुपयाला बरे करून घरी आणण्याची काही योजना आहे का? असा सवाल खासदार रेवनाथ रेड्डींनी प्रश्नोत्तर काळात विचारला. काँग्रेसच्या कार्यकाळात रुपयाच नाही तर संपूर्ण अर्थव्यवस्थाच आयसीयूत होती. कोरोना संकट, रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवरही भारताची अर्थव्यवस्था वाढत आहे. यामुळे संसदेत बसलेल्या काही लोकांचा जळफळाट होतोय.देशाच्या वाढत्या अर्थव्यवस्थेवर गर्व व्हायला हवा, त्याची थट्टा मस्करी करणे योग्य नाही, अशा शब्दात सीतारामण यांनी रेड्डी यांना सुनावले.

Nirmala Sitharaman : तर कारवाई करू

अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, संबंधित सदस्य तेलंगणामधून येतात. ते म्हणतात की त्यांची हिंदी भाषा थोडी कच्ची आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील मी कच्च्या हिंदीत देईन. अर्थमंत्र्यांच्या या उत्तरावर रेड्डी संतापले. अर्थमंत्र्यांनी जातीय टिपणी केल्याचा आरोप त्यांनी केला, परंतु सदनाच्या कामकाजात अशाप्रकारच्या शब्दांचा वापर करू नये; अन्यथा कारवाई करू, असा इशारा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रेड्डी यांच्यासह इतर खासदारांना दिला.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news