ग्रीनलँडमधील वितळणारा बर्फ वाचवणे आता कठीण | पुढारी

ग्रीनलँडमधील वितळणारा बर्फ वाचवणे आता कठीण

न्यूयॉर्क ः

ग्रीनलँडमध्ये बर्फाचे स्तर मोठ्या प्रमाणात वितळून जाण्याची क्रिया सुरूच आहे. आतापर्यंत हा बर्फ इतका वितळला आहे की त्याची भरपाई होणे कठीण आहे. हिमवृष्टीमुळेही आता त्याची पूर्ण भरपाई होऊ शकणार नाही. ग्रीनलँडमधील बर्फ मोठ्या प्रमाणात वितळत असल्याने समुद्राची पातळी वाढून जगातील किनारपट्टीवरील शहरांनाही धोका निर्माण होत आहे.

ओहियो स्टेट युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबत चिंता व्यक्‍त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की जागतिक तापमानवाढ थांबली तरी वितळलेला बर्फाचा वरचा स्तर पूर्ववत होऊ शकणार नाही. जागतिक तापमानवाढीमुळे ग्रीनलँडचे तापमानही वाढत आहे. गेल्या उन्हाळ्यात ग्रीनलँडमध्ये 60 हजार टन बर्फ वितळून समुद्रात मिसळला. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील संशोधिका इझाबेल वेलिकोग्‍ना यांनी याचवर्षी मार्चमध्ये म्हटले होते की ग्रीनलँडमधील तापमान वाढल्याने त्याचा परिणाम बर्फाच्या स्तरांवर पाहायला मिळत आहे.

तिथे 2002 ते 2018 या काळात दरवर्षी जितका बर्फ सरासरीने वितळला आहे त्यापेक्षा अधिक बर्फ केवळ गेल्या वर्षीच वितळला होता.

Back to top button