कासवाने वाचवले ‘दोस्त’ माशाचे प्राण | पुढारी

कासवाने वाचवले ‘दोस्त’ माशाचे प्राण

नवी दिल्ली : कधी कधी नकळतपणेही एखाद्याला आपली मदत होऊ शकते. असाच प्रकार एका माशाबाबत झाला. पाण्याबाहेर आलेल्या माशाला एका कासवाने अशीच नकळत ‘मदत’ केली व हा मासा पुन्हा पाण्यात गेला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले!

याबाबतचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असे दिसते की हा मासा पाण्यातील एका खडकावर पडला आहे. पाण्यातून एक कासव त्याच्याजवळ येते व त्याला तोंडाने ओढू लागते. कदाचित त्याला हा मासा खायचा होता म्हणून ते असा प्रयत्न करीत होते. मात्र, त्याच्या या ओढण्यामुळे मासा पाण्यात ओढला गेला व लगेचच तो विजेच्या चपळाईने पुढे निघून गेला. या व्हिडीओवर लोकांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहींना कासवाने आपल्या मित्राला मदत केली असल्याचेही वाटले व त्यावरून लोकांनीही माणुसकीचा धडा घ्यावा असे म्हटले! या व्हिडीओला दीड लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले असून पाच हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.

Back to top button