दिव्यांग मुलीचे जिम्नॅस्टिकमध्ये अफलातून कौशल्य | पुढारी

दिव्यांग मुलीचे जिम्नॅस्टिकमध्ये अफलातून कौशल्य

वॉशिंग्टन : मनात जिद्द असेल तर माणूस कोणत्याही समस्येवर चिकाटीने मात करून यश मिळवू शकतो. ‘हिम्मत करनेवालोंकी कभी हार नही होती’ हेच खरे आहे. एका दिव्यांग मुलीचे जिम्नॅस्टिकमधील कौशल्य पाहून त्याची प्रचिती येत आहे. याबाबतचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

अमेरिकेतील ओहायो येथील अवघ्या आठ वर्षांच्या मुलीचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ अनेकांसाठी प्रेरक ठरला आहे. या मुलीला जन्मतःच दोन्ही पाय नाहीत. मात्र, त्यामुळे तिची प्रगती खुंटलेली नाही. द़ृढसंकल्प आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर तिने या खेळात मोठे कौशल्य मिळवले आहे. जे कॅलेंडिन असे तिचे नाव. तिने वयाच्या अठराव्या महिन्यापासूनच जिम्नॅस्टिकचे धडे घेण्यास सुरुवात केली होती. तिला जिम्नॅस्टिकमध्येच पुढे करिअर करण्याची इच्छा आहे. यामध्ये ती यशस्वी ठरणार हे तिच्या सध्याच्याच कौशल्यावरून स्पष्ट दिसून येते.

Back to top button