त्याने घरातच पाळलाय जिराफ | पुढारी | पुढारी

त्याने घरातच पाळलाय जिराफ | पुढारी

कराची :

लोक घरात कुत्रे पाळतात, मांजर पाळतात, कबुतर पाळतात, कोंबडा पाळतात, पोपट पाळतात इतकेच काय अरब देशात काही घरात वाघही पाळतात; पण पाकिस्तानमधील एका अवलियाने घरात जिराफ पाळला आहे. त्याचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक जिराफ घराच्या उंच संरक्षक भिंतीच्या पलीकडून डोकावताना दिसत आहे. यावरून पाकिस्तानात प्राणीप्रेमी संघटनेने आवाज उठवण्यास सुरुवात केली असून जावेद महर यांनी सिंध वाईल्डलाईफ विभागाकडे याची तक्रार केली आहे. याचा मालक कोण आहे, त्याची अजून ओळख पटलेली नाही.

संबंधित बातम्या
Back to top button