105 वर्षांच्या आईला पाठीवर घेऊन तो पोहोचला बँकेत | पुढारी

105 वर्षांच्या आईला पाठीवर घेऊन तो पोहोचला बँकेत

रांची :

कोरोना संकटामुळे गरिबांचे आयुष्य आणखीनच खडतर बनले आहे. सार्वजनिक वाहतूक बंद असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार झारखंडमध्ये घडला.  

रांका जिल्ह्यातील गढवा गावातील 60 वर्षीय बिफन भुयान याने आपल्या 105 वर्षांच्या आईच्या खात्यातून पेन्शनची रक्‍कम काढण्यासाठी पाठीवर बसवून 4 किलोमीटर असणार्‍या बँकेपर्यंत घेऊन जावे लागले. परंतु, इतके करूनही त्यांना बँकेत प्रवेश मिळाला नाही. बँकेत प्रवेश करण्यासाठी त्यांना कोरोना चाचणी करावी लागणार होती.

त्यांच्याकडे चाचणी अहवाल नसल्याने त्यांना आत सोडण्यात आले नाही. आईला पाठीवर घेतलेल्या भुयानचा फोटो प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध होताच. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्याची तातडीने दखल घेतली आणि प्रशासन हडबडून जागे झाले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने बँक मॅनेजरने सदर महिलेला तिच्या घरी जाऊन पेन्शनची रक्‍कम आदा केली.

Back to top button