प्राण्यांच्याही अनेक प्रजाती अडकू शकतात कोरोनाच्या विळख्यात | पुढारी

प्राण्यांच्याही अनेक प्रजाती अडकू शकतात कोरोनाच्या विळख्यात

वॉशिंग्टन : डेव्हीसच्या वैज्ञानिकांनी एका नव्या संशोधनात असा दावा केला आहे की प्राण्यांच्याही अनेक प्रजाती कोरोना विषाणूच्या विळख्यात अडकू शकतात. ‘कोविड-19’चा धोका केवळ मानवालाच आहे असे नाही. 

एका अध्ययनानुसार लुप्त होण्याच्या मार्गावर असलेले गोरिला, ओरांगऊटान आणि गालावर सफेद केस असलेले काळे लंगूर हे कोरोना संक्रमणाबाबत अतिसंवेदनशील असू शकतात. ग्रे व्हेल व बॉटलनोज डॉल्फिन तसेच चिनी हॅम्स्टरमध्येही विषाणूचा धोका अधिक आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार पाळीव मांजर, गुरेढोरे, बकर्‍या, शेळ्या-मेंढ्या यांच्यामध्ये मध्यम स्वरूपाची जोखीम असून कुत्रा, घोडा आणि डुक्करांसाठी कमी स्वरूपाची जोखीम आहे. या संशोधनासाठी पेशींच्या ‘एसीई-2’ रिसेप्टरचाही अभ्यास करण्यात आला. सुमारे 410 प्रजातींमधील सजीवांच्या शरीरात घुसण्यासाठी कोरोना याच रिसेप्टरचा आधार घेऊ शकतो. कोरोनाचे स्पाईक या रिसेप्टरला पकडून पेशीला जखडून ठेवतात व नंतर विषाणूची संख्या वाढते.

Back to top button