पृथ्वीचा कोअर  एक अब्ज वर्षांचा! | पुढारी

पृथ्वीचा कोअर  एक अब्ज वर्षांचा!

वॉशिंग्टन ः पृथ्वीचा घनरूप असा आतील गाभा म्हणजेच इनर कोअर हा एक अब्ज वर्षांपूर्वीच बनलेला असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. आधुनिक पृथ्वी ही एखाद्या लेअर केकसारखीच आहे. त्यामध्ये ठोस बाह्य आवरण, तप्‍त मँटल, द्रवरूप बाह्य कोअर आणि घनरूप अंतर्गत कोअर यांचा समावेश आहे. आतील हे घनरूप कोअर बाह्य द्रवरूप कोअर हळूहळू थंड होऊन त्याचे स्फटिक बनत गेल्यावर तयार होते.

या प्रक्रियेमुळे बाह्य द्रवरूप कोअरच्या मंथनाला ऊर्जा मिळते व त्यापासून पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र तयार होते. हे क्षेत्र संपूर्ण पृथ्वीभोवती एखाद्या आवरणासारखेच असते व त्यामुळे पृथ्वीचे हानिकारक अवकाशीय किरणोत्सारापासून संरक्षण होते. त्यामुळेच हा अंतर्गत कोअर महत्त्वाचा ठरतो. हा इनर कोअर म्हणजे 2442 किलोमीटर रुंदीचा एक लोखंडी गोळाच आहे. त्याच्याविषयी फारशी माहिती उपलब्ध नव्हती.

त्याचे वय 50 कोटींपासून ते चार अब्ज वर्षांपर्यंत सांगितले जात असे. पृथ्वीचेच वय साडेचार अब्ज वर्षांचे आहे. आता संशोधकांनी लोखंडाचा तुकडा व दोन हिर्‍यांच्या सहाय्याने केलेल्या एका प्रयोगातून असे अनुमान काढले आहे की या इनर कोअरचे वय 1 ते 1.3 अब्ज वर्षांइतके आहे.


 

Back to top button