कंगनाच्या ‘तेजस’चे डिसेंबरमध्ये शूटिंग | पुढारी | पुढारी

कंगनाच्या ‘तेजस’चे डिसेंबरमध्ये शूटिंग | पुढारी

मुंबई ः

‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’नंतर आता कंगना पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार आहे. तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटात ती भारतीय लढाऊ विमानाच्या पायलटच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ‘फर्स्ट लूक’ समोर आला असून त्यामध्ये कंगना विमानासमोर उभी असताना दिसून येते. या चित्रपटाचे डिसेंबरमध्ये शूटिंग सुरू होणार आहे.

आपल्या अभिनयाच्या जोरावर, अन्य कोणतेही बडे नाव सोबत नसतानाही चित्रपट हिट करून दाखवण्याची किमया सध्याच्या काळात विद्या बालन आणि कंगना रणौतनेच करून दाखवलेली आहे. तीन खानांपैकी एकाबरोबरही काम न करता आज कंगना स्वतःच्या बळावर मोठी स्टार झालेली आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कंगनाने दिग्दर्शनातही आपले कौशल्य दाखवलेले आहे. कंगनाच्या टीमने आता या चित्रपटाची माहिती सोशल मीडियातून दिली आहे.

आपले कर्तव्य बजावण्यासाठी मोठा त्याग करणार्‍या भारतीय लढाऊ विमानांच्या स्त्री-पुरुष पायलट वीरांची कहाणी सांगणार्‍या या चित्रपटाचा हिस्सा बनल्याचा आम्हाला अभिमान असल्याचे टीमने म्हटले आहे. या चित्रपटाची कथा सर्वेश मावरा यांनी लिहिली असून त्यांनीच दिग्दर्शनही केले आहे. ‘उरी’सारख्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या आरएसव्हीपी मुव्हीजद्वारे हा चित्रपट बनवला जात आहे.

 

Back to top button