तीन मिनिटांत खाल्‍ले दहा डोनट्स! | पुढारी

तीन मिनिटांत खाल्‍ले दहा डोनट्स!

बर्मिंघम :

अनेक लोक ‘विक्रमासाठी वाट्टेल ते’ अशा थाटात प्रयत्न करीत असतात. त्यामध्ये खाद्यपदार्थांशी किंवा खाण्याशी संबंधितही काही अचाट विक्रमांचा समावेश असतो. आता इंग्लंडमधील एका महिलेनेही असाच एक विक्रम केला आहे. तिने तीन मिनिटांपेक्षाही कमी वेळेत दहा डोनट्स खाऊन दाखवले आहेत. 

इंग्लंडमध्ये बर्मिंघममधील लिह शटकेव्हर नावाच्या महिलेने कोरोना काळात हा खाण्याचा विक्रम केला आहे. तो रेकॉर्ड 16 मे 2020 रोजी करण्यात आला होता. विशेष म्हणजे एकदाही ओठ न चाटता तिला हा विक्रम करायचा होता. आता अशा पद्धतीने तिने हा विक्रम केल्याचे गिनिज बुकने म्हटले आहे. नुकताच हा व्हिडीओ यू ट्यूबवर पोस्ट करण्यात आला असून तो व्हायरलही होत आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 82 हजार लोकांनी पाहिले आहे. या महिलेने हा विक्रम 2 मिनिटे 53 सेकंदांमध्ये पूर्ण केला आहे. यापूर्वी सर्वाधिक म्हणजेच सहा डोनट्स खाण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील जेसी फ्रीमन या व्यक्‍तीच्या नावावर होता. 1 जुलै 2018 मध्ये त्याने हा विक्रम करीत 1 मिनिटात 6 डोनट्स खाऊन दाखवले होते. विविध कंपन्याही अशाच प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठे पदार्थ बनवत असतात. नुकतेच एका बि—टिश कंपनीने 10.66 मीटर लांबीचा ‘पफकॉर्न’ बनवला होता. क्रिकेटच्या खेळपट्टीच्या अर्ध्या लांबीचा हा पफकॉर्न होता. त्याचीही गिनिज बुकमध्ये नोंद करण्यात आली आहे.

Back to top button