चक्‍क ‘लायटिंग’ असलेली साडी ! | पुढारी

चक्‍क ‘लायटिंग’ असलेली साडी !

नवी दिल्‍ली ः जुन्या जमान्यात ‘बदन पे सितारे लपेटे हुए’ असे एक गाणे होते. या गाण्याचे शब्द खरे ठरणारी एक साडी आता समोर आली आहे. अमिताभ बच्चन यांनी ‘याराना’ चित्रपटात लायटिंगचा पोशाख परिधान केला होता. ‘सारा जमाना हसीनों का दिवाना’मधील अशा लायटिंगच्या पोशाखाने बरीच लोकप्रियता मिळवली होती. आता अनेक वर्षांनी अशाच स्वरूपाची एक साडी परिधान केलेल्या महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या महिलेच्या साडीतून दिवे लुकलुकत असल्याचे दिसून येते. एका दुकानासमोरील फुटपाथवर ही महिला उभी असून एक व्यक्‍ती तिचे व्हिडीओ शूटिंग करीत असतानाही दिसतो. दुकानातील महिलेला तेथील लाईटस् बंद करण्यास सांगितले जाते जेणेकरून या साडीचा प्रकाश आणखी ठळकपणे दिसेल. साडी परिधान केलेली ही महिला रस्त्यावरही काही अंतर फिरून या साडीचे प्रदर्शन करते. आयव्हरी म्हणजेच हस्तीदंती रंगाची ही साडी पिवळसर प्रकाशाच्या दिव्यांनी लुकलुकत असताना दिसून येते. या साडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्‍त केल्या आहेत. हा व्हिडीओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही.

Back to top button