संयुक्त अरब अमिरातीची पहिली महिला अंतराळवीर | पुढारी

संयुक्त अरब अमिरातीची पहिली महिला अंतराळवीर

दुबई : संयुक्त अरब अमिरातीने आपल्या अंतराळ कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच एका महिलेची अंतराळवीर म्हणून निवड केली आहे. दुबईचे शासक शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी ट्विटरवर दोन अंतराळवीरांच्या नावांची घोषणा केली. त्यामध्ये नूरा अल मातुशी हिचा समावेश आहे. नुरा ही यूएईची पहिली महिला अंतराळवीर ठरली आहे.

नूराशिवाय मोहम्मद अल मुल्ला याची अंतराळवीर म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोघांची 4 हजार उमेदवारांमधून निवड करण्यात आली. त्यासाठी वैज्ञानिक पात्रता, शिक्षण, अनुभव, शारीरिक व मानसिक क्षमता आदी निकष लावण्यात आले होते. नूराचे वय 27 वर्षांचे असून तिने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे. सध्या ती अबुधाबीच्या नॅशनल पेट्रोलियम कन्स्ट्रक्शन कंपनीत कार्यरत आहे. अल मुल्ला याचा जन्म 1988 मध्ये झाला असून तो दुबई पोलिसांच्या हवाई खात्यात पायलट म्हणून कार्यरत आहे. नूरा आणि अल मुल्ला हे दोघेही अमेरिकेत टेक्सासच्या ह्यूस्टनमधील ‘नासा’च्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये प्रशिक्षण घेतील.

 

Back to top button