समुद्रतळाशी स्पाँज करतात स्थलांतर | पुढारी | पुढारी

समुद्रतळाशी स्पाँज करतात स्थलांतर | पुढारी

बर्लिन : खोल समुद्रतळाशी असलेले स्पाँज हे जलचर स्थलांतर करीत असतात याचे पहिले पुरावे समोर आले आहेत. संशोधकांनी आर्क्टिक समुद्राच्या तळाशी अशा स्पाँजच्या सरकत पुढे गेल्यानंतर मागे निर्माण झालेल्या विचित्र अशा तपकिरी मार्गाचे फोटो टिपले आहेत.

स्पाँज हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन जीवसमूहापैकी एक आहे. तब्बल साठ कोटी वर्षांपासून त्यांचे पृथ्वीतलावर अस्तित्व आहे. हे जीव समूहाने राहतात आणि समुद्रतळाशी दाट वसाहत निर्माण करतात. ते हालचालही करतात याचे पुरावे मिळालेले नव्हते. एखाद्या खडकाभोवती ते वाढतात आणि अतिशय मर्यादित स्वरूपाच्या हालचाली करतात इतकेच त्यांच्याविषयीची माहिती होती. मात्र, आता समुद्रात 700 ते 1000 मीटर खोलीवर असलेले स्पाँज बरेच अंतर पुढे सरकत जातात असे आढळले आहे. त्यांच्या या सरकण्यामुळे समुद्रतळाशी निर्माण झालेली रचना दिसून आली आहे. हे अपृष्ठवंशीय प्राणी अशा पद्धतीने हालचाल करतात हे प्रथमच दिसून आले. जर्मनीतील काही संशोधकांनी याबाबतचे संशोधन केले असून त्यांनी या स्पाँजमुळे निर्माण झालेल्या मार्गांचे विविध फोटोही टिपून घेतले आहेत. 

 

Back to top button