‘फायझर’ आणणार कोरोनावरील गोळी! | पुढारी | पुढारी

‘फायझर’ आणणार कोरोनावरील गोळी! | पुढारी

न्यूयॉर्क : सध्याच्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी जगभरात विविध प्रकारच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत. ‘फायझर’ या कंपनीनेही एक लस विकसित केलेली आहे. आता याच कंपनीने कोरोनावरील एक औषधही तयार केले असून ते पुढील वर्षापर्यंत उपलब्ध होऊ शकेल. कंपनीचे सीईओ अल्बर्ट बॉर्ला यांनी म्हटले आहे की तोंडावाटे घेतले जाणारे तसेच लसीच्या रूपात अशा दोन प्रकारचे हे औषध आहे. सामान्य सर्दी-तापाप्रमाणेच गोळ्यांचे सेवन करून कोरोनावर मात करता येऊ शकेल.

कंपनीने सध्या हे दोन अँटिव्हायरल बनवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. एका मुलाखतीत बॉर्ला यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की ही औषधे अतिशय उपयोगी ठरू शकतात. याचे कारण म्हणजे ‘कोव्हिड-19’ च्या उपचारासाठी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावे लागणार नाही. आपण घरीच राहून या गोळ्या खाऊन बरे होऊ शकतो. जर सर्व काही सुरळीत झाले व या औषधाला मंजुरी मिळाली तर कदाचित या वर्षअखेरपर्यंतही हे औषध उपलब्ध होऊ शकेल. हे अँटिव्हायरल औषध कोरोनाच्या विविध व्हेरिएंटस्वरही प्रभावी ठरेल. सध्या ‘कोव्हिड-19’ वरील उपचारात रेमडेसिवीर या गोळ्यांचेच सेवन केले जात आहे.

 

Back to top button